सांजवेळ

सांजवेळ



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पाऊले चालती
परतीच्या वाटा
ओढ घराची,
आठवे उंबरठा….१

कलत्या सांजेला
गाईगुरांचा हंबर
गोठ्यातील दावणीला
वाटे हुरहूर….२

झाली सांजवेळ
दिवाबत्ती देवळात
पाखरांची किलबिल
खोप्यात झाली शांत…३

तना मनाची उलघाल
लाल,केशरी क्षितिजावर
भावनांचे तरंग,
चाले जीवनाची सफर…४

धुसरल्या दिशा
स्वप्न उद्याचे घेऊन
अबोल झाली निशा
उगवतीच्या ओढीनं….५

अशी सांजवेळ
झाली कातर कातर
पुन्हा,नव्यानं येईल
घेऊन,किरणांची कलबुत ….६

पैठणकर के आर (प्राथ,शिक्षक,त्र्यंबकेश्वर)
ता.येवला जि.नाशिक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles