
प्रेम काय असतं!
एकमेकांचा करा स्विकार
जपल्या मनी भावना थोर
हृदयातून प्रेम जिंकणार
तुझा अन माझा संसार!
दोघे पती पत्नी जरूर
विचारवंत नसे कमजोर
नको हातभर हे अंतर
डोळ्यात दिसे वारंवार!
नाजूक रेशमी एक दोर
भासते कोण समजदार
सापडले कसे गुणोत्तर
नवीन प्रेमाचे नवे स्वर!
करता प्रेमाचा विचार
मंदावते भूक खरोखर
चूक आहे की बरोबर
दिसे प्रेमाची एक लहर!
प्रेम काय असतं ?नजर
शिरते हृदयाच्या पार
खरं दोघांच्या मनावर
प्रेम नाजूक असतं फार!
श्रद्धा हवी एकमेकांवर
सांगा नित्य खरे समोर
कुंटनीती असते बेकार
जसं दोघे रणभूमीवर!
प्रेम असते हे जादूगार
नाचते कधी तालावर
दोघांचा जुळतो सूर
कधी कसा रे परस्पर !
प्रेम हृदयाचे मुख्य द्वार
मन त्याचे हे पहारेदार
जीवनात असे चक्रधर
प्रेम मोरपिसांची तलवार
अशोक महादेव मोहिते
बार्शी जिल्हा सोलापूर