बाप..

बाप



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रत्येक मुलीच्या हृदयाची
आर्त हाक बाप असतो
भलेही त्यांच्या नजरेचा
मुलींना सार्थ धाक असतो.

कणखर कडक बाणेदार
मनावर त्यांचा छाप असतो
प्रत्येक मुलींचा सखा, सारथी
पाठीराखा हा बाप असतो.

नारळा सारखा कठोर कवच
आतून मऊ मलाई बाप असतो
मुलांसाठी आयुष्य झिजवणारा
मनाने हळवा वलय बाप असतो.

जबाबदारीने वाकलेला,झुकलेला
कुटुंबाचा कणा बाप असतो
काळजीने सिनलेला ,थकलेला
तरीही रुबाबदार बाणा बाप असतो.

स्वतःच्या गरजा सोडणारा
कष्टाचा झरा बाप असतो
कुटुंबाची शान राखणारा
खाणीतला हिरा बाप असतो.

हृदय दाटून आले, उर फाटून गेले
तरी काही न बोलणारा बाप असतो
स्वतःचे दुःख तराजूत न तोलणारा
वज्रासारखा भक्कम बाप असतो.

याची जाणीव प्रत्येकाला भासते
बापाची उणीव काळजात ठसते
आठवण हृदयाला कुरतडत राहते
बाप हे मनामनातून अखंड वाहते.

बेबीताई बोईनवाड नरवाडे
जिल्हा नांदेड
======

Previous article
Next article

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles