संगम..

संगमपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

संगम
दोन जीवांचा…
पण आधी तो
असावा मनांचा…
राधा कृष्णासम
दोन जीव एक प्रांणांचा..
सीता रामाच्या
त्याग,वचन,समर्पणाचा…
संगम
हृदयाशी हृदयाचा..
धकधकणाऱ्या ठोक्यातून
येणाऱ्या आर्त भावनांचा…
संगम
गुरू-शिष्यातील
सूक्ष्म समर्पण भावाचा..
संस्कार साधनेच्या
आत्मिक नात्याचा…
संगम
दऱ्याखोऱ्यातून जीवाच रान
करीत वाहणाऱ्या..
नदी-सागराचा..
अस्तित्व ना उरावे वेगळे
अश्या सागरी लाटात समावण्याचा…
संगम
धरा-अंबराचा
तहानलेल्या तप्त धरेवर
पावसाच्या शीतल थेंबानी
वर्षाव करीत
विरह वेदना क्षमविण्याचा…
संगम असावा असा..
संगम असावा असा..

संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर, गुजरात
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles