
फौजी
देशाचा फौजी शूरवीर
चोवीसतास ड्युटीवर
कर्तव्यचा हा शिलेदार
देशाचा खरा पहारेदार!
असतो तैनात सिमेवर
वाट पाही बायको पोरं
पावसाळ्यात गळे घर
आईचं दुःख कमजोर!
बापच देतोय रे आधार
जगतो हा तळहातावर
कष्ट शेतात दिवसभर
पोटास रे अर्धी भाकर!
चिंता करी फौजी जरूर
सुट्टी नसते कधी वेळेवर
कर्तव्य पहिले हे निरंतर
उसणे बळ घेई अंगावर!
झेलतो किती हा प्रहार
शब्द नसे या ओठांवर
सैनिकांचे विचार थोर
देशभक्ती नजरेची धार!
बोले पत्रातून थोडंफार
चिंता नको मी ड्युटीवर
देतोय हा शुभ समाचार
यात्रेला जरूर मी येणार!
कशी घरी चिमणी पाखरं
आई नक्की बरी होणार
बघायचं कौतुक हे जरूर
बाबा आजोबा रे होणार!
मित्र विचारी कधी येणार
फौजीला मान रे भरपूर
मिळे मेडल नवे छातीवर
देशाचा गौरव असे थोर !
अशोक महादेव मोहिते
कवी, सैनिक,लेखक
बार्शी,जिल्हा सोलापूर
========