
मशाल
हे तरूणा ऊठ ,जागृत हो
पेटव मशाल माणुसकीची
लाव आग विघातक प्रवृत्तींना
दे तिलांजली धर्माधतेला
समाजकंठकाच्या हदयात
जागृत कर ‘राष्ट्राभिमान’
हे तरूणा ऊठ………
सळसळू दे रक्त धमन्यात
घे शस्त्र हातात ‘निखदूत’
काढ दहशतवाद, नक्षलवाद
जागृत कर’ देशाभिमान’
हे तरुणा ऊठ…….
उत्तरेत धगधगतो ‘काश्मिर’
दक्षिणेत “वेगळा” ‘तेलंगणा’
तोड फुटीरतेच्या शृंखला
निर्माण कर ‘स्वदेशाभिमान’
हे तरूणा ऊठ…….
हे तरुणा ऊठ, जागृत हो
पेटव मशाल माणुसकीची
प्रा.डॉ.कल्पना सांगोडे, नंदेश्वर
अर्जुनी/मोर.गोंदिया
========