
स्मृतीगंध
तुझ्या सहवासातील आठवणी
हदयीकप्प्तात आसनस्थ
तुझ्या पाऊलखुणांची दिशा
माझ्या जीवनाला मार्गस्थ
माझ्या आयुष्यातील तूच
सर्वस्व वाहिलेला प्रेमी
आज अंनतात विलीन तरी
तुझ्या स्मृतीगंधात रिझते मी
मन माझे अडकून जाते तुझ्या
प्रितीच्या शब्द स्पर्शगंधात
शब्द ते फूलून येतात माझ्या
आपसूकच त्या ओठात
माझ्या अवतीभोवती
तुझुच मुर्ती दिसते छान
तुझ्याच त्या प्रेमरंगाचे
गाते मी गुणगाणं
त्या शीत अमृत गंधात
माझे स्वरगंध हरवते
तुझ्या स्मृतीगंधाचे क्षण
माझ्या लेखणीत वाहते…
माझ्या लेखणीत वाहते…
सुधा अश्वस्थामा मेश्राम
अर्जुनी/मोर.गोंदिया
========