गुरुवारीय चित्रचारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळ्या

➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ८७ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*आम्ही वाया गेलो नाही*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

घडलो बि घडलो आम्ही
संस्काराचे धडे शिकलो
आम्ही वाया गेलो नाही..
आदर्श नागरिक झालो

*सौ.सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪻🚩🪻♾️♾️♾️♾️
*आम्ही वाया गेलो नाही*

केल्या असतील थोड्या खोड्या
वर्गात जरी घेतले नाही
आम्ही पण हुशारच आहोत
आम्ही वाया गेलो नाही

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪻🚩🪻♾️♾️♾️♾️
*आम्ही वाया गेलो नाही*

प्रत्येकवेळी पदरात उपेक्षा
समजून कोणीही घेत नाही
एक संधी द्या अभिव्यक्तीला
अजून आम्ही वाया गेलो नाही

*दत्ता काजळे उस्मानाबाद*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪻🚩🪻♾️♾️♾️♾️
*आम्ही वाया गेलो नाही*

कृष्ण सुध्दा होता नटखट
आई माप करित होती की नाही
आमच्याही हातून होतात चुका
पण आम्ही वाया गेलो नाही

*केवलचंद शहारे*
सौंदड गोंदिया
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪻🚩🪻♾️♾️♾️♾️
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*आम्ही वाया गेलो नाही*

आम्ही वाया गेलो नाही कारण
माहीत होते चकल्यावर गुरुजी शिक्षा देतात
हल्लीच्या काळात दोन शब्द बोलल्यावरही
पालकच शिक्षकांवर आक्षेप घेतात

*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
♾️♾️♾️♾️🪻🚩🪻♾️♾️♾️♾️
*आम्ही वाया गेलो नाही*

उनाडक्या केल्या नाही
जरी मस्तीखोर असलो
आम्ही वाया गेलो नाही
थोरांच्या शिस्तीत वाढलो

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪻🚩🪻♾️♾️♾️♾️
*आम्ही वाया गेलो नाही*

चुकलो तर करा शिक्षा पण
आम्ही वाया गेलो नाही
समजून घ्या कलागुणांना वाव द्या
इतके आम्ही वाईट नाही.

*सौ विमल धर्माधिकारी वाई सातारा*
*©सदस्या मराठीचे शिरेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪻🚩🪻♾️♾️♾️♾️
*आम्ही वाया गेलो नाही*

आमच्यातील खट्याळपणा
हिच उद्याच्या यशाची नांदी असेल
आम्ही वाया गेलो नाही, भविष्यात
न्युटन, गॅलेलियो आमच्यातच दिसेल

*सौ अर्चना जगदीश मेहेर*
ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪻🚩🪻♾️♾️♾️♾️
*आम्ही वाया गेलो नाही*

लहानपणीच वाचल्या आदर्श कथा
शिवबाचे मातृप्रेमही तेव्हाच शिकलो..
म्हणूनच कसल्याही संगतीने,आघाताने
आम्ही मुळीच वाया नाही गेलो…

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
इंदापूर पुणे
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪻🚩🪻♾️♾️♾️♾️
*आम्ही वाया गेलो नाही*

शिक्षा मिळाली शाळेत
आम्ही वाया गेलो नाही
वर्गाबाहेरचा हा आनंद
सदैव मनामध्ये वाही

*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles