
पुरूष असाही…
कणखरतेचे नाव विराजी
संयमाचे गाव विराट…
पापणीआडचा पूर अनामिक
त्याला नसते नाव काही…
प्रसंगानुरूप कर्तव्य बजावतो
नसतो शोधत भाव काही…
संकटांना पेलतो अविरत
बनतो खंबीर देण्या हिंमत…
कर्तव्यपथावर दिसतो तत्पर
ठेवतो मनात भविष्याचा विचार…
स्व:स्वप्नांना मोडतो क्षणात…
नित पेरण्या सुखचांदणे
यशगतीचे बघून सोहळे
भविष्याचं चित्र कोरतो मनात…
विसावलेल्या सुखक्षणांना
समाधानाने वेचून घेतो काळजात…
मुलगा, भाऊ, पती, वडील…
प्रत्येक पात्रातील संघर्ष साहसी
पण, त्यागीलेल्या…खपलेल्या… निर्वतलेल्या…
भावसंवेदना असतात बेनामी…
आयुष्याला जगवणारा…उभारणारा… आकारणारा…
शाश्वत विश्वास जीवनपथाचा…
न दिसणारा श्वासच असतो तो
न कळणारा अदैत असतो तो…
आशा कोवे-गेडाम
वणी जि. यवतमाळ
=====ञ