
अनामिका
उदास नाराज वृत्तीला
अनामिका स्पर्श करते
संस्काराची जाणीव देवून
मनावर ताबा मिळवते
जे मनी इच्छिते
तेच जीवनात घडवते
सकारात्मक विचारला
अनामिका खंबीर बनवते
सोबत कोणी असू किंवा नसू
मनीची अनामिका सोबत असते
हसवते रुजवते समजावते
मनातला कल्लोळ थांबवते
कधी आधारवड होते
तर कधी प्रेम वलयाची धरती
तर कधी घुसमट दूर करणारी
सरस्वती शारदेची मूर्ती
जेव्हा ऐकांत आवडतो
तेव्हा अनामिकेची सोबत
तू कुठं आहेस काय करतेस
सिंहावलोकन सांगते कानात
पडले की उठवते.
पळालो की थांबवते
सारासार विचार करून
मनाला आवर घालते
अशी ही अनामिका
प्रत्येकीच्या अंतरी असते
स्त्रीच्या स्त्री अस्तित्वाची..
आदिशक्तीची शक्ती असते
सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे