
*घुसमट*
तुझ्याविना जगतांना
सगळीच होते चोरी
सांगाव्या कशा भावना
तुटे अंतरीची दोरी…… १
एकच स्पर्श मायेचा
हवा असतो कधी
स्पर्श सुखाला वंचित
जीव जळतो मधी……. २
दिसते ओठावरचे हसू
हृदयीची वेदना दिसेना
चरे पडती काळजाला
हालचाल कुणी पुसेना…. ३
केले कवितेला जवळ
संपली घुसमट सारी
हृदयातले शब्द वहीवर
कविता होते सुंदर न्यारी… ४
दुःख सर्वांच्या जीवनी
येती जाती फिरफिरूनी
होऊन उडण्या फुलपाखरू
नक्षी काढतो वरवरूनी…. ५
सविता धमगाये
नागपूर
जि. नागपूर