
साप्ताहिक साहित्यगंधच्या सहसंपादकपदी ‘संग्राम कुमठेकर’ यांची निवड
_प्रकाशक, संपादक राहुल पाटील व सचिव पल्लवीताई पाटील यांचे आभार_
लातूर: मा.मुख्य संपादक राहुलदादा पाटील, निवासी व मुख्य कार्यकारी संपादक ऐडव्होकेट पल्लवीताई पाटील व कार्यकारी संपादक सविताताई पाटील (सवूताई) सर्व सहसंपादक मंडळींनी माझ्यावर विश्वास दाखवून “सहसंपादक” म्हणून माझी निवड करून सन्मानित केले त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद*
“साहित्यगंध” साप्ताहिकाची अंक १ ते अंक ८७ पर्यंतची वाटचाल आपण पाहत आलोय.लवकरच १०० व्या अंकाचा शतकपूर्ती महोत्सव साजरा करण्याचा मानस मा.राहुलदादांनी व्यक्त केला होता.त्यासाठी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून साहित्यगंध साप्ताहिक विक्रमी पानांचा होईल यासाठी आपले योगदान द्यावे.
माझ्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी निःस्वार्थपणे व प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी कटीबद्ध आहे.दादांना शतकोत्सव साजरा करण्यासाठी सहसंपादक म्हणून माझे संपूर्ण सहकार्य राहिल.आजपर्यंत कोणतीही अपेक्षा न करता दादांनी सोपविलेली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत आलोय.कदाचित माझ्याकडून नकळत कुणाचे मन दुखावले असेल तर मनःपूर्वक दिलगीरी व्यक्त करतो.
सहसंपादक म्हणून जबाबदारी स्विकारत असताना आनंद होत आहे . या प्रवासात माझ्या लेखणीला वेळोवेळी प्रोत्साहन देऊन माझ्यावर विश्वास दाखविणा-या सर्व शिलेदार ताई दादांचे मनःपूर्वक धन्यवाद मानतो.माझी मोठी बहिण वैशालीताई व दिलखुलास , हसमुख बहीण सवूताई तसेच आ.स्वातीताई, प्रा.तारकाताई, सुधाताई, प्रतिमाताई, वृंदाताई अरविंददादा, अशोकदादा, हंसराजदादा,विकासभाऊ इ.सर्व सहप्रशासक मंडळींचे व सचिव पल्लवीताई यांचे आभार व सदैव कार्यतत्पर राहून माय मराठी सक्षमीकरणाच्या या यज्ञकुंडात वाहून घेण्याचे अभिवचन देतो व थांबतो. सहप्रशासक किशोरदादा बन्सोड यांचेही मनःपूर्वक आभार व धन्यवाद