
एवढी लोकप्रियता असेल तर तुम्ही निवडणुका घेऊन दाखावा
अजित पवारांचे शिंदेंना खुले आव्हान
मुंबई: राज्यातील काही प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरच आज भाजप आणि शिंदे सरकारच्या सर्वेक्षणाची जाहिरात आली आहे. भाजप -शिंदेंनी सर्वेक्षणाचा करण्याचा विश्वविक्रमच केला. पण हे सर्वेक्षण कुणी केलं, अशी जाहिरात कधी पाहिली. त्यामागंच कारणही समजलं नाही, पण जर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारची एवढी लोकप्रियता असेल तर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेऊन दाखावा, जनतेच्या मैदानात निर्णय होऊ द्या, असे खुले आव्हान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले आहे.