आजचे दिनविशेष: दि १५ जून २०२३ गुरूवार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🔴 आजचे दिनविशेष🔴*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📘दिनांक: १५ जून २०२३: गुरुवार📘*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🌀महत्त्वाच्या घटना🌀*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*१६६७: वैद्यकीय इतिहासात प्रथम रक्तदान करण्यात आले. जॉं बाप्तिस्ते डेनिस या डॉक्टरने १५ वर्षे वयाच्या एका फ्रेंच मुलाच्या शरीरात कोकराचे रक्त टोचले. त्या मुलाला काहीही अपाय झाला नाही, पण नंतर सर्वच माणसांना असले रक्तदान सोसत नाही हे स्पष्ट झाले.*

*१७६२: ऑस्ट्रिया देशांत कागदी नोटाचे चलन सुरु करण्यात आले.*

*१७७५: अमेरिकन क्रांती – जॉर्ज वॉशिंग्टनची खंडीय सेनेच्या नेतेपदी नेमणूक.*

*१८४४: चार्ल्स गुडइयरने रबराच्या व्हल्कनायझेशनचे पेटंट घेतले.*

*१८६९: महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला. श्री. पांडूरंग विनायक करमरकर यांनी वेणुताईच्या गळयात माळ घातली.*

*१९१९: कॅप्टन जॉन अलकॉक व लेफ्टनंट आर्थर ब्राऊन यांनी विमानातुन सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला.*

*१९७०: बा. पां. आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.*

*१९९३: संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ’अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्त करण्यात आली.*

*१९९७: अजामीनपात्र गुन्ह्याचा आरोप असलेली व्यक्ती फरारी होऊन आरोप चुकवत असेल, तर तिच्यावर आरोपपत्र दाखल नसतानाही न्यायमूर्ती अटक वॉरंट जारी करू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्‍च न्यायालयाने दिला.*

*२००१: प्रसिद्ध भारतीय बुद्धिबळ पटू ग्रँडमास्टरविजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम यांनी नॅशनल ‘ए’ विस्डम स्पर्धा सलग पाचव्यांदा जिंकून विश्वविक्रम रचला.*

*२००२: नियर अर्थ ऍस्टेरॉइड २००२ एम.एन. पृथ्वीपासून फक्त १,२०,००० कि.मी. (७५,००० मैल) दूरून गेला.*

*२००८: ’लेहमन ब्रदर्स’ या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.*

*♻️जन्मदिवस / जयंती / वाढदिवस♻️*

*१८७८: भारतीय-अमेरिकन गोल्फर मार्गारेट अॅबॉट यांचा जन्म. (मृत्यू: १० जून १९५५)*

*१८८४: स्वातंत्रपूर्व भारतातील ब्रिटीशविरोधी बंगाली भारतीय क्रांतिकारक आणि आंतरराष्ट्रीयतावादी विद्वान तारकनाथ दास यांचा जन्मदिन.*

*१८९८: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९८६)*

*१८९९: भारतीय सैन्य दलाचे माजी सैन्य प्रमुख जनरल महाराज श्री राजेंद्रसिंह जडेजा यांचा जन्मदिन.*

*१८९९: साल पद्मभूषण पुरस्कार प्रसिद्ध भारतीय चित्रकार, शिल्पकार आणि ललित कला अकादमीचे संस्थापक अध्यक्ष देवी प्रसाद राय चौधरी वाढदिवस.*

*१९०७: स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे यांचा जन्म. (मृत्यू: १ मे १९९३)*

*१९१२: प्रसिद्ध उत्तर भारतीय साहित्यकार श्रीमन्नारायण अग्रवाल यांचा जन्मदिन.*

*१९१७: संगीतकार मेंडोलीनवादक सज्जाद हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९९५ – माहीम, मुंबई)*
*१९२३: साहित्यिक केशवजगन्नाथ पुरोहित ऊर्फ शांताराम यांचा जन्म.*

*१९२८: प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, समिक्षक, शिक्षक. ललित लेखक, उत्तम वक्ता व सूत्रसंचालक साहित्यकार शंकर वैद्य यांचा जन्मदिन.*

*१९२९: गायिका व अभिनेत्री सुरैय्या जमाल शेख ऊर्फ सुरैय्या यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २००४)*

*१९३३: महाराष्ट्रीयन मराठी लेखिका, समिक्षक, ललितलेखन, चरित्रलेखन, समीक्षा साहित्याच्या साहित्यकार तसचं, महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेच्या माजी संचालक सरोजिनी वैद्य यांचा जन्मदिन. (मृत्यू: ३ ऑगस्ट २००७)*

*१९३४: भारतीय राजकारणी व राज्यसभेचे सदस्य देवदास आपटे यांचा जन्मदिन.*

*१९३७: किसन बाबूराव तथा ‘अण्णा‘ हजारे – आदर्श ग्रामपरिवर्तन करुन देशाला व जगालाही समाजपरिवर्तनाची नवी दिशा दाखवणारे समाजवेवक*

*१९४३: माजी भारतीय क्रिकेटपटू तपन बॅनर्जी यांचा जन्मदिन.*

*१९४७: प्रेमानंद गज्वी – साहित्यिक व नाटककार. ‘किरवंत’ हे प्रसिद्ध नाटक, ११ एकांकिका, १३ नाटके, २ लघुकथासंग्रह, १ कादंबरी, १ कवितासंग्रह अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे. ‘घोटभर पाणी’ (1977) या त्यांच्या एकांकिकेचे ३००० हुन अधिक प्रयोग झाले आहेत. २००३ मध्ये त्यांनी ‘बोधी नाट्य परिषदेची’ स्थापना केली.*

*१९५०: भारतीय स्टील उद्योग सम्राट व जगातील सर्वात मोठ्या स्टीलमेकिंग कंपनी आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी मित्तल यांचा जन्मदिन.*

*💠मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:💠*

*१५३४: योगी चैतन्य महाप्रभू (जन्म: १८ फेब्रुवारी १४८६)*

*१८७८: भारतातील ‘राधा स्वामी सत्संग’ पंताचे संस्थापक शिव द्याल साहब यांचे निधन.*

*१९३१: अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखन शैलीचे प्रवर्तक, संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचे निधन.*

*१९७१: वेंडेल मेरेडिथ स्टॅनले, अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता (जन्म: १ ऑगस्ट १८७९)*

*१९७९: सूर्यकांत रामचंद्र खांडेकर – कवी व गीतकार (जन्म: २ एप्रिल १९२६)*

*१९८३: श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ’श्री श्री’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलगु कवी व गीतकार (जन्म: ३० एप्रिल १९१०)*

*१९९६: निर्मलादेवी – पतियाळा घराण्याच्या ठुमरी व दादरा गायिका आणि चित्रपट अभिनेत्री. बॉम्बे सिनेटोन या कंपनीतून त्यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीस सुरुवात केली. सवेरा (१९४२), कानून (१९४३), गाली (१९४४), चालीस करोड (१९४६), अनमोल रतन (१९५०), चक्रम (१९६८), सती अनसूया (१९७४) हे त्यांचे काही चित्रपट आहेत. सवेरा, कानून, शमा परवाना, बावर्ची, राम तेरी गंगा मैली इत्यादी चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायनही केले आहे. ९० च्या दशकातील सुपरस्टार गोविंदा हा त्यांचा मुलगा आहे. (जन्म: ७ जून १९२७)*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🙏संकलन/मुख्य सहप्रशासक🙏*
*✍श्री अशोक लांडगे*
95273 98365
*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles