सावंगी रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात

सावंगी रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुसद तालुका प्रतिनिधी

पुसद: मानोरा तालुक्यातील एकलारा येथील विजय जाधव व ईश्वर राठोड हे दोन युवक दुचाकीने पुसद कडे पुसद सांवगी रस्त्याने लग्नकार्या करिता दि. ११ जुन रोजी येत होते. दुपारी तीन वाजता च्या दरम्यान रस्त्यावर दुचाकीचा अपघात झाल्यामुळे सदरील दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील पुसद सावंगी रस्त्यावर दि.११च्या दुपारी तीन-साडेतीन वाजता च्या दरम्यान अचानक अवकाळी पाऊस कोसळत असताना
दुचाकी चा अपघात होऊन दोन युवक जखमी झाले. सदरील रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून थंड बस्त्यात पडलेले असून रस्त्याचे काम योग्य पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाने केले असते तर कदाचित या रस्त्यावरील अपघात टळले असते.

या रस्त्याचे काम करीत असलेल्या कंत्राटदारांनी काम अर्धवट ठेवल्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्यावर वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. लग्न कार्याकरिता पुसदला आलेले दोन युवक दुचाकीच्या अपघातात जखमी झाल्यामुळे यांना उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles