
जि.प.प्रा.शा.रत्नापूर येथे साजरा झाला ‘आनंद वचनपूर्तीचा’
परभणी: मानवत तालुक्यातील जि प प्रा शाळा रत्नापूर येथील शिक्षक संग्राम कुमठेकर सरांच्या वचनपूर्तीमुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला. कुमठेकर सरांचे वडील कै.संभाजी कामाजी कुमठेकर यांचे दि.११ जून २०१८ रोजी निधन झाले होते.१५ जून २०१९ रोजी पहिल्या पुण्यतिथीनिमित्त सरांनी शाळेतील १०० % विद्यार्थ्यांना मानवतचे गटशिक्षणाधिकारी मा.संजयजी ससाणे साहेब व जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मा.डी.आर.रणमाळे साहेब व रत्नापूरचे गावकरी यांच्या उपस्थितीत १५००० रूपयाचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले होते.
तेव्हा मा.ससाणे साहेबांनी मनोगत मांडताना हा आदर्श पायंडा असाच चालू ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती आणि त्याच वेळी मी सेवेत असेपर्यंत दरवर्षी ११००० रूपयाचे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे कुमठेकर सरांनी वचन दिले होते.
आज दि.१६ जून २०२३ रोजी पाचवे पुण्य स्मरणानिमित्त मानवतचे केंद्रप्रमुख मा.शिरीषजी लोहट सरांच्या उपस्थितीत वचनपूर्तीचा आनंदसोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप, कार्यक्रमासाठी शाळेचे मु.अ.चंद्रकांतदादा पौळ सर, प्रा.प.अशोकभाऊ सरवदे सर,श्रीमती आम्रपाली मोटे मॕडम,श्रीमती स्वप्नाली आवले मॕडम तसेच गावचे सरपंच मा. चक्रधरभैय्या राजे व गावकरी उपस्थित होते.आदर्श पायंडा समाजासमोर निर्माण केल्याबद्दल सर्वांनी कुमठेकर सरांचे कौतुक केले.