
डावपेच
डावपेच असा
नियतीने रचला
मी वाहवत गेले
आणि तो हसत सुटला
कधी कुठल्या क्षणाला
काय येथे होणार
कुणास असते ठाऊक
कोण घायाळ होणार
आपले म्हणून कोणी
आपले होत नसते
ओठात एक आणि
पोटात एक असते
हसत करावे सहन सारे
सारेच तारीफ करते
प्रतिकार करावे नको असलेले
अचानक वाईट ठरते
डावपेच मजला कधीच
रचता आले नाही
नात्यांच्या चक्रव्युहातून
बाहेर निघता आले नाही
डावपेच करणारे आज
सज्जनांच्या यादीत बसलेले
खेळ खेळून खुशाल
रंगीबेरंगी रंगात रंगलेले
ज्योती सुधीर कार्लेवार,चंद्रपूर
======