केल्याने होत आहे..

केल्याने होत आहे…पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

केल्याने होत आहे
हे ध्यानी असू दे,
शिक्षणाशिवाय राहू नको
ध्यास मनी वसू दे..||धृ.||

ज्ञानाची कवाडे आहेत
सदाच उघडी,
ज्ञानसागरात आता तू
मार खुशाल उडी

झोकून दे स्वतःस असा
बाकी तमा नसू दे,
केल्याने होत आहे
हे ध्यानीअसू दे..||१||

घे वसा शिकण्याचा
कर स्वतःला सिद्ध,
घे पेलून आव्हाने
हे जिंकण्यास युध्द

आळसास आता कुठेही
थारा नसू दे,
केल्याने होत आहे
हे ध्यानी असू दे..||२||

शिकून होशील मोठा
ऋण मातापित्यांचे फेडशील
तरीच आयुष्यात पुढे
दिवस सुखाचे पाहशील

भविष्य उज्ज्वल असेल
याचे भान असू दे,
केल्याने होत आहे
हे ध्यानी असू दे…||३||

निराश होऊ नको कधी
प्रयत्न थांबवू नको,
बाळगली जी स्वप्ने उराशी
त्यांना लांबवू नको

प्रवास तुझ्या शिक्षणाचा
अखंड दिसू दे ,
केल्याने होत आहे
हे ध्यानी असू दे||४||

गुरूजनांच्या उपकाराची
जाणीव ठेव जरा मनी,
निरक्षरतेचा कलंक समूळ
टाक नष्ट करूनी

समाजात तुझी कधीही
खाली मान नसू दे,
केल्याने होत आहे
हे ध्यानीअसू दे..||५||

सरस्वतीचे मंदिर सदैव
असेच खुले राहू दे,
शिकण्यास सर्वांस आता
सतत प्रेरित हो होऊ दे

साने गुरूजी तुझ्यात,
तुझ्यात फुले,महर्षी दिसू दे
केल्याने होत आहे
हे ध्यानी असू दे||६||

पांडुरंग एकनाथ घोलप
ता.कर्जत,जि.रायगड
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles