घाण साफ करून रस्ता दुरुस्तीसाठी न. प. ला आवाहन

घाण साफ करून रस्ता दुरुस्तीसाठी न. प. ला आवाहन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुसद तालुका प्रतिनिधी

पुसद: नगर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रोडची झालेली चाळणी, रस्त्यावर निर्माण झालेले घाणीचे साम्राज्य दुर करण्यासाठी माजी नगरसेवक साकिब शाह यांनी रस्त्यावरील घाणीच्या पाण्यात बसून प्रशासनाला सात दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे.

शहरातील खड्डे बुजवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चूनही खड्डे जैसे थे कसे असा प्रतिप्रश्न करीत यामुळे प्रशासना च्या विरोधात नागरिकांतून संताप व्यक्त करीत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची वेळ नगरवासीयांना आल्याची बाब सुद्धा शाह स्पष्ट केली आहे.

पुसद नगरपालिकेच्या हद्दीमधील प्रभाग क्रमांक ७ मधील वसंतनगरच्या पहिल्या गल्लीमधील सांडपाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे अनेक वर्षापासून रस्ता पूर्णता खरडून गेला आहे, रस्त्याची अक्षरशा चाळणी झाली आहे. त्यामुळे रस्त्याला नालीचे स्वरूप आले आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यामुळे व त्यात साचलेल्या घाणीमुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

महादेवाच्या मंदिरात पूजा करण्यासाठी भाविकांना ये -जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर मस्जिद मध्ये नमाज साठी याच मार्गाने जावे लागते तसेच याच मार्गावर शाळा कॉलेज असल्याने मुला-मुलींना याच रस्त्यातील घाणेतून वाट काढावी लागते. या परिसरातील नागरिकांना सुद्धा घाणीच्या दुर्गंधीचा व आरोग्यास घातक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. मुला मुलींसह नागरिकांचे सुद्धा या रस्त्यावरून वाट काढताना अपघात झालेले आहेत. याबाबत नागरिकांनी या नगरपालिका प्रशासनाकडे अनेकदा तोंडी व लेखी तक्रारी दिले आहेत परंतु या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी एकच संताप व्यक्त केला आहे.

या समस्येकडे माजी नगरसेवक तथा पुसदच्या भ्रष्टाचाराला दूर करण्यासाठी नेहमी आपल्या वेगवेगळ्या आंदोलनातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यास अग्रेसर असलेले साकिब शहा यांनी या गंभीर बाबीची दखल घेतली आणि अक्षरशा रस्त्यावरील घाणीमध्ये बसून आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. नागरिकांच्या पैशातून पगार घेणाऱ्या नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी नोकरांनी मालक बनवून हुकुमशाही गाजवून नागरिकांना त्रास देऊ नका. असा इशारा देत सात दिवसात या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन रोड दुरुस्त करून रस्त्यावरील घाण साफ न केल्यास तीव्र आंदोलनु छेडण्यात येईल असा इशारा साकीब शहा यांनी मुख्याधिकारी पुसद यांना तक्रारीतून दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles