बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळ्या

➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ९१ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*उनाड मन*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

उनाड मन भिरभिर
स्वैर उडे वाऱ्यावरी
मन स्वप्नाळु फिरे
भव्य अंतराळावरी

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🎗️🌸🎗️➿➿➿➿
*उनाड मन*

मनाच्या तालावर नाचते उडान मन
अविचारानें सैरभैर होवून,
साथसंगतीमध्ये,होते मग्न
सारेच, होते,जीवनाचे विद्रुप दर्शन.

*मायादेवी गायकवाड*
मानवत, परभणी
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🎗️🌸🎗️➿➿➿➿
*उनाड मन*

कधीतरी अलवार
डोकावते बालपण
उनाड मन बागडे
आले जरी मोठेपण

*सौ.श्वेता मिलिंद देशपांडे*
*जामनगर, गुजरात*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🎗️🌸🎗️➿➿➿➿
*उनाड मन*

उनाड मन हे माझे
भटके रानीवनी…
अवचित जाते कधी
ते राधेच्या वृंदावनी…

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
इंदापूर पुणे
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🎗️🌸🎗️➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*उनाड मन*

उनाड मन वेडे
स्वप्नापाठी धडपडे
न होता मनासारखे
मनोमन झुरे

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🎗️🌸🎗️➿➿➿➿
*उनाड मन*

कधी इथे कधी तीथे
सैरभैर उनाड मन
आनंदी कधी स्वच्छंदी
भुलवून टाकते सारे तन.

*चव्हाण बी.एम परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🎗️🌸🎗️➿➿➿➿
*उनाड मन*

सख्या दूर जरी तू
तरी सैराट धावते
उनाड मन तुझ्या
आसपास भटकते

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🎗️🌸🎗️➿➿➿➿
*उनाड मन*

*उनाड मन किती चंचल*
*एकेजागी स्थिर होत नाही*॥
*घालत राहतो सतत पिंगा*
*कधीच धीर धरत नाही*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🎗️🌸🎗️➿➿➿➿
*उनाड मन*

मन झालय सैरभैर
विनविते राया धरुन तुझे पाय
थकलेल्या उनाड मनाला
बांध घालतोस काय

*सौ.भावना अजय इटकीकर*
हिंगणघाट जि.वर्धा
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🎗️🌸🎗️➿➿➿➿
*उनाड मन*

पहिल्या पावसाच्या रिमझिम सरींनी
चराचरात मृदेचा गंध दरवळला
सृष्टीचे विलोभनीय रूप पाहूनी
उनाड मन आतुर झाले भिजायाला

*सौ. सुनिता लकीर आंबेकर*
दादरा नगर हवेली
*©️सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🎗️🌸🎗️➿➿➿➿
*उनाड मन*

वय झाले किती ही तरी
उनाड मन ठेवावे जपून….
आठवणींना संगति घेऊन
भूतकाळात जावे रमून…….

*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🎗️🌸🎗️➿➿➿➿
*उनाड मन*

चहूदिशात फिरून येत
उनाड मन एका ठिकाणी राहून
सुखाचे किरण चेहेऱ्यावर पसरतात
ते आनंदाचे क्षण पाहून

*सोनाली रायपुरे-सहारे ब्रम्हपूरी*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles