बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : उनाड मन🥀*
*🍂बुधवार : २१/ जून /२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ९१ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*उनाड मन*

बंधमुक्त उनाड मन असं
कसं सैरभैर धावत सुटतं ,
नाकात वारे शिरल्यागत
इकडून तिकडं हुंडारतं…!

योग्य,अयोग्य जाण नसे
नाही ओझं जबाबदारीचं ,
मौजमज्जा करीत राही
भान न राहतं कर्तव्याचं…!

उनाड मन भटकत राही
थांगपत्ता न लगे कुणाला ,
काय करतोय काय नाही
कल्पना नसे याची याला…!

उनाड मन मोकाट फिरे
वायुवेगे सुसाट धाव घेई ,
करु पाहतयं वेगळं काही
त्याची तया वाटे नवलाई…!

उनाड मना आवराव कसं
काही केलं काबूत राहीना ,
गगनभरारी घेई क्षणार्धात
जमिनीवरती पाय रोविना…!

उनाड मन खोडकर भारी
करीत राही थट्टा मस्करी ,
आनंद देईल कधी कोणा
उठेल कुणाच्या जीवावरी…!

या फुलाहून त्या फुलावर
फुलपाखरागत उडत जाई ,
चंचल मन हे स्थिरता नसे
मधुगंध आस्वाद घेत राही…!

*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🎗️🌸🎗️➿➿➿➿
*उनाड मन*

किती किती सांभाळू रे,
किती किती समजावू…
झालं सैरावैरा आता,
लागे वेड्यासम धावू…१

आता होतं आसपास,
आता गेलंय आकाशी…
कधी डोकावी दऱ्यात,
कधी डोंगर टोकाशी… २

जैसे फुलांच्या पाकळ्या,
तैसे रंगती गुलाबी…
कधी चाखे मधुरस,
होऊनिया ते शराबी…३

वर्णू किती गोडवे रे,
करू किती रे गाऱ्हाणे…
कधी पक्ष्यांच्या थव्यात,
टिपे शेतातले दाणे…४

किती आवरू तयाला,
नाही येतं आटोक्यात…
हाकलता पुन्हा येई,
उभ्या शेताच्या पिकात…५

कधी करी कुणा खोडी,
कधी लावी लाडीगोडी…
कधी मस्करीच्या नादी,
करी लबाडी ही थोडी…६

असे हे उनाड मन,
सापडेना हातामधी…
*सुधाकरा* सावर रे,
वेड्या मना कधी कधी…७

*सुधाकर भगवानजी भुरके गुमथळा नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह नागपूर*
➿➿➿➿🎗️🌸🎗️➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*उनाड मन*

तुझी सोबत हवी तर
भेटतो तुला वारंवार
नाही माझी ग तक्रार
झेलतो छातीवर वार!

उनाड मनाला आवर
उधळते हे वाऱ्यावर
कधी भेटायचं जरूर
आदळते किनाऱ्यावर!

उनाड मनात खरोखर
दिसते तुझी तसवीर
हवी तुझीच निरंतर
साथ सोबत परिवार!

योग्य वेळी घडत सारं
जर घेतलं हेच मनावर
उनाड मनाची रे हार
होतास तूच बरोबर !

मैत्रीचा आनंद फार
ठेव भरोसा मजवर
नको कर्जाचा भार
समजून घे लवकर!

उनाड मनात जर
दिसली प्रेमाची तार
मन हेच रे मनोहर
भाळलो मी तुजवर!

*श्री अशोक महादेव मोहिते*
बार्शी जिल्हा सोलापुर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🎗️🌸🎗️➿➿➿➿
*उनाड मन*

कसं आवरू सांगा
या उनाड मनाला
उडतोया वरचे वर
मनस्ताप रे तनाला||१||

धार मनाची चंचल
चौफेर धाव असते
कधी हे तर ते करू
स्थिर कुठेही नसते||२||

सैरावैरा धावू लागे
असे हे उनाड मन
कितीही समजावले
नसे विचार गहन||३||

करतसे साऱ्या चुका
नसे तया पश्चात्ताप
वेळ निघूनिया जाता
होई असा मनस्ताप||४||

असे वयामध्ये येताच
उनाडक्या करत फिरते
असा सुटताच ताबा
पहा चौफेर भिरभिरते||५||

अशा उनाड मनाला
लागे घालावा आवर
नको वाया जावू देऊ
तुझे भविष्य सावर||६||

*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
➿➿➿➿🎗️🌸🎗️➿➿➿➿
*उनाड मन*

मन रानात-वनात
मन श्रावण थेंबात
मन  प्रतिबिंब माझे
तुझ्या डोळ्यांच्या ऐन्यात

मन सावळ्या मेघात
मन आकाशी ताऱ्यात
मन निवांत हे संथ
तुझ्या मनाच्या डोहात

मन पावसाची धारा
मन खट्याळसा वारा
उनाड मन गुंफले
तुझ्या ओलेत्या रुपात

मन  आठवांचे तळे
मन गंधाळले मळे
माझे हळवे गं गीत
तुझ्या केशर ओठात

मन चंचलसा पारा
मन अचलसा तारा
कधी ग्रीष्मातील धारा
रंगे इंद्रधनु रंगांत

मन भिजते दंवात
मन प्राजक्त गंधात
मस्त चांदण चुऱ्यात
मन नाहते गंधात

मन माझे गं ओढाळ 
मन चांदणं मोहोळ
मन घुटमळे सखे
तुझ्या चाहूल वाटेत

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🎗️🌸🎗️➿➿➿➿
*उनाड मन*

कधी विरहात जगे
कधी आकंठ प्रेमात
कधी उनाड वासरू
हवा भरली कानात

कधी फुलांवर बसे
बने तो फुलपाखरू
कधी गाईला चिपके
होई कसा रे गोखरू

कधी पाणी खळखळ
उठे हृदयी तरंग
कोणी नाही ओळखले
भाव अन अंतरंग

वाहे प्रीतीचा रे झरा
तिच्या मनात घुसून
कधी राग आला तिला
बसे कसा रे रूसून

माझे रे उनाड मन
जशी हातात गोफण
नेम लागे काळजात
कधी गेला रे चुकून

*डॉ. संजय भानुदास पाचभाई, नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🎗️🌸🎗️➿➿➿➿
*उनाड मन*

उनाड मन
गगनात भरारी
जगाची वारी

उनाड मन
आकाशीचा पतंग
मस्तीत दंग

उनाड मन
पिकातले हे ढोर
नाचते मोर

उनाड मन
खळखळता झरा
हर्षते जरा

उनाड मन
भुईवर क्षणात
धाव नभात

उनाड मन
त्याला वाटा अनेक
असते नेक

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🎗️🌸🎗️➿➿➿➿
*उनाड मन*

उनाड मन घालते पिंगा,
विचारांच्या हजारो रांगा
कधी हळवे होते लाजाळूपरी,
कधी स्वतःशीच करते दंगा

कळत नाही का त्याला की,
कळूनही वेड्याच सोंग घेतं
डोळ्याच्या पापणीआड हळूच,
का बरं स्वतःला दडवू पहातं

उनाड मन किती जपाव जपाव,
पावलोपावली स्वप्नांच गाव दिसावं
धडधडत्या हृदयाला स्पर्श होताच
कळीच अलगद सुंदर फुलं व्हावं

उनाड मनाची व्यथा कशी मी मांडू,
किती चोखंदळ आहे कसं बरं सांगू
हसता हसता डोळे अलगद भरतात,
सांग बरं किती त्याच्या रंगात मी रंगू

ओढली चादर चांदण्यांची चंदेरी,
आठवणींच पांघरूण घेतलं उरी
एक एक आठवण उलगडून पाहात
आल्या डोळ्यातून हळूच आसवांच्या सरी.

*सौ.सविता वामन ठाणे*.
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*.
➿➿➿➿🎗️🌸🎗️➿➿➿➿
*उनाड मन*

उनाड मन चंचल
राहे ना थाऱ्यावर
दाही दिशा हुंडारते
स्वार होऊन वाऱ्यावर

कसं आवराव याला
बेभान बेलगाम पळते
कधी सागर तळाशी
क्षणात नभाला भिडते

मन चंचल पाखरू
स्वछंदी बागडते
कधी भ्रमर होऊन
पाना फुलांशी खेळते

कुणी डिवचता त्याला
तो एकांत शोधते
कधी होऊन निर्धास्त
वाट काट्याची चालते

याच्या चंचल स्वभावाला
कुठलं घालावं वेसण
आवरेना मला जराही
चंचल, उनाड मन.

*सौ. इंदू मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🎗️🌸🎗️➿➿➿➿
*उनाड मन*

मन उनाड हा वारा
फिरे कसा गरागरा
मन असते पाखरू
घेई झेप तें अंबरा….

मन करिते कल्पना
मन चित्र ही रेखीते
मन राहतसे ठाम
कधी चिंतीत होते….

मन अलगद पिसारा
करते हळूच इशारा
मन बेधुंद वारा
जशा बरसणाऱ्या गारा….

मन भावनेचे घरटे
जीवन त्यापुढ हारत
मन संगीताचा ताल
जसा आठवणीचा काळ….

मन मित्र मैत्रीणीची साथ
जशी आनंदाची लाट
मन आनंदाचा क्षण
फुलून जाणारा तनमन….

मन उनाड हे भारी
किती करते विचार
कधी भले कधी बुरे
कधी होते रे बेजार….

मन उनाड उनाड
जसा सैरावैरा वारा
मन लुकलूकनारे तारे
लक्ष वेढनारे सारे…

*श्रीमती वर्षा मोटे*
छत्रपती संभाजी नगर
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles