बी.आर. एस. मध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा शिलानंद कांबळे यांच्या नेतृत्वात प्रवेश

बी.आर. एस. मध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा शिलानंद कांबळे यांच्या नेतृत्वात प्रवेशपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तालुका प्रतिनिधी ता. पुसद

पुसद: शहरात दि. २१ जून २०२३ रोजी कार्यकर्त्यां समवेत विश्रमागृह येथे चर्चा करुन त्यानंतर माऊली सभागृहामध्ये शेकडो कार्यकत्यांनी ज्येष्ठ समाजसेवक तथा लिमका बुक मध्ये समाजसेवी नोंद असलेले तथा शेतकरी व बिआरएस समन्वयक नेते शिलानंद कांबळे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी तथा पदाधिकारी सरपंच, उपसरपंच यांनी बि.आर.एस. मध्ये प्रवेश केला. या प्रसंगी डॉ. सुभाष राठोड तथा राजुभाऊ ताळीकुटे यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांना प्रवेश देवून पार्टीचे काम करण्यासाठी संधी दिल्ली आहे.

भारत राष्ट्र समितीचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या तेलंगना राज्यातील कामे पाहून शिलानंद कांबळे यांनी मुख्यमंत्री चंद्रशेखरराव यांचे हस्ते प्रवेश घेवून काल दि. २१ जून २०२३ आपल्या शेकडो कार्यकत्यांना प्रवेश देण्यात आला. या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये देखील त्यांनी केलेल्या कामाचे रुपांतर महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने हा प्रवेश महत्वाचा मानल्या जात आहे. तेलंगनाचे मुख्यमंत्री के.सी. आर. यांनी १०० टक्के विज मोफत देवून शेतकऱ्यांचा उध्दार करण्याचे काम केले. त्याच बरोबर एकही हेक्टर कोरडवाहू जमिन न ठेवता १०० टक्के सिंचन क्षेत्र बनविले आहे.

त्याचबरोबर १० हजार रुपये एकरी बियाणासाठी अनुदान दिल्या जात आहे. तसेच दलित बंधू तथा मागासवर्गीयासाठी १० लाख रुपये विना परताना कुटूंबाना देवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम केल्या जात आहे. तसेच घरकुल योजनेसाठी ६ लाख रुपये दिल्या जात आहे. तर उच्च शिक्षणासाठी २० लाख रुपये बिना व्याजी दिल्या जात आहे. तसेच कॅनोल द्वारे शेतीला पाणी दिल्या जाते तेही मोफत. त्यामुळे तेलंगनामध्ये एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली नाही. हा देशाच्या इतिहासाची ही कामे आहेत.

*बी आर एस पक्षात प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांची नावे*

सरपंचा लिलाबाई कांबळे, माजी सरपंच तसेच खरेदी विक्री संघाचे ता. उमरखेडचे सन्मानिय सदस्य कैलास घोगरे, ग्रा.पं. सदस्या विद्याबाई डोंगरे, मिराबाई कान्हेकर, शेशीकलाबाई कांबळे, माजी सरपंच गिरजाबाई कांबळे, जिजाबाई कांबळे, विमलाबाई वाघमारे, निर्मलाबाई कांबळे, स्वप्निल पाईकराव, नरहरी ताळीकुटे, आमन ताळीकुटे, राहूल ताळीकुटे, भिमराव ढोबळे, सिध्दार्थ डोंगरे, देविदास कांबळे, विलास नथ्थु पाईकराव, राजु कांबळे, अमोल खंदारे, विलास पाईकराव, डॉ. प्रमोद चव्हाण, खुशाल चव्हाण, अनिल देवकते, मांगीलाल आडे, गणेश देवकते, शाम ताळीकुटे, सुनिल गुळवे, क्रिष्णा ताळीकुटे, प्रभाकर खंदारे, गोविंदा ताळीकुटे, एकनाथ नामनोर, अशोक ताळीकुटे, मनोज बिरंगणे, गजानन देवकते, दत्ता देवकते, गोविंदा ताळीकुटे, सचिन ताळीकुटे, विठ्ठल ताळीकुटे, काळुराम ताळीकुटे, हर्षल ताळीकुटे, संजु ताळीकुटे, अर्जुन ताळीकुटे, अमोल ताळीकुटे, रोहित ताळीकुटे, क्रिष्णा ताळीकुटे असे शेकडो कार्यकर्त व पदाधिकाऱ्यांनी भारत राष्ट्र समितीच्या पक्षामध्ये प्रवेश घेतला.

त्या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत उमेश चव्हाण, दिपक पवार, हेमंत राठोड, रामु चव्हाण, दिपकराव कोम्पेलवार, जयाताई आराटे, रुपाली शेंडे मॅडम यवतमाळ, संतोष कांबळे, विष्णु लहाने, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराव बोरगडे, डॉ. संतोष भोने यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश घेण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles