अमेरिकेत मोदींविरोधात ‘गो बॅक मोदी’च्या घोषणा ; नागरिकांच्या हातात झळकले “मोदी खूनी”चे पोस्टर

अमेरिकेत मोदींविरोधात ‘गो बॅक मोदी’च्या घोषणा ; नागरिकांच्या हातात झळकले “मोदी खूनी”चे पोस्टर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जंगी स्वागत केले. राष्ट्राध्यक्षांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये नरेंद्र मोदींचा पाहुणचार करण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणातून मोदींनी जो बायडेन यांचे आभार मानले. मात्र हे सगळं जरी चांगलं पार पडले असले तरी दुसरीकडे अमेरिकेतील नागरिक पंतप्रधान मोदींविरोधात रस्त्यावर उतरून त्यांचा निषेध नोंदवताना दिसून आले.

अमेरिकेतील नागरिकांनी काश्मीरचा प्रश्न, शेतकरी आंदोलन, अल्पसंख्यांकांवर होणारे हल्ले, मानवाधिकार कायद्यांची पायमल्ली आदी प्रश्नांवरून अमेरिकेतील विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोदींविरोधात रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. हातात पोस्टर घेऊन त्यांनी मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा निषेध केला आहे. आंदोलनकर्त्या नागरिकांनी ‘गो बॅक मोदी’, ‘मोदी नॉट वेलकम’ अशा आशयाचे पोस्टर घेऊन पंतप्रधान मोदींचा निषेध केला आहे.

“मोदी हा पूर्वेतील उगवता हिटलर आहे, बायडेन यांनी मोदींच्या फॅसिझमला खतपाणी घालणं थांबवावं”, “पंतप्रधान मोदी अल्पसंख्यांकांना मारणं थांबवा”, “मोदी हे खूनी आहेत”, “हिंदुत्व हे हिंदूंचं वर्चस्व आहे”, “मोदीजी, पोलिसांकडून शेतकऱ्यांवर होणारे अत्याचार थांबवा, अन्यायकारक शेतकरी कायदे मागे घ्या”, “भारतीय दहशतवादाचा चेहरा मोदी”, असे असंख्य संदेश देणारे पोस्टर्स घेऊन नागरिक अमेरिकेत पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलन दिसून आले.

“नरेंद्र मोदी आणि त्यांची फॅसिस्ट राजवट भारतातील मानवी हक्कांचे (विशेषत: अल्पसंख्याकांचे) उल्लंघन करत आहे. नरेंद्र मोदी संपूर्ण दक्षिण आशियावर राज्य करण्याच्या ध्येयाने त्यांची हिंदुत्ववादी विचारधारा जगभरात निर्यात करत आहेत. तरीही यूएन आणि न्यूयॉर्कने मोदींना आणि त्यांच्या फॅसिस्ट विचारसरणीला येथे बोलण्यासाठी आमंत्रित केलं आहे. त्यामुळे मोदी आणि त्यांच्या विचारधारेला विरोध करण्यासाठी एकत्रित व्हा. न्यूयॉर्क मोदींचं आणि त्यांच्या हिंदुत्वाचं समर्थन करत नाही,” अशी हाक अमेरिकेतील विविध संघटनांनी दिली आहे. यामध्ये, ‘देसीस रायझिंग अप अँड मुव्हींग’, ‘हिंदुज फॉर ह्युमन राइट्स’, ‘क्वीन्स अगेन्स्ट हिंदू फॅसिझम’ आणि ‘वर्ल्ड सिख पार्लिमेंट’ अशा संघटनांचा समावेश आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles