
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारणी पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची महत्वाची ‘गूगल मीट’ द्वारे बैठक
नागपूर : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या नुतन राज्य कार्यकारणी पदाधिकारी व सर्व जिल्हाध्यक्षांची महत्वपूर्ण बैठक ‘गूगल मीट’ द्वारे आनलाईन उद्या दि. २५ जून २०२३ रोजी ठिक ११.०० वा. आयोजित करण्यात आली आहे.
सदर बैठक ही मा. अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली असून, या बैठकीस कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस सतीश कांबळे, राज्य कार्याध्यक्ष बी डी धुरंधर व वरिष्ठ उपाध्यक्ष विजय जाधव मार्गदर्शन करणार असून संघटनेच्या पुढील मार्गक्रमणाबाबत सविस्तर मनोगत मांडणार आहेत.
राज्य कार्यकारणीतील सभासद तसेच सर्व जिल्हाध्यक्ष यांनी या तातडीच्या बैठकीस आवर्जून उपस्थित राहून उपकृत करावे. आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच संघटनेचे ध्येय धोरण निश्चित करता येईल असा आम्हास विश्वास वाटतो. आयोजित बैठकीची ‘गूगल मीट’ लिंक ही १०.०० वाजता राज्यस्तरीय कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या व्हाट्सप ग्रुपवर पाठविण्यात येईल.