४ राज्यात सायबर फसवणूक करणा-या टोळीतील ०६ आरोपीना अटक

४ राज्यात सायबर फसवणूक करणा-या टोळीतील ०६ आरोपीना नागपुरात अटकपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: वरीष्ठ पोलीस निरीक्षक अमित डोळस सायबर पोलीस ठाणे
नागपूर शहर यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे केमीकल इंजीनिअर डिग्रीधारक असून २०१५ ते २०२१ दरम्यान दुबई मध्ये खाजगी नोकरीला होते. त्यानंतर भारतात परत आले व नोकरीच्या शोधात त्यानी Naukri.com, Linkedin.com यावर बायोडाटा टाकला असता त्यांना जॉब संबधाने Filmsbabycow.com लिंक आली व त्यांनी वॉटस्अप CHAMPIONS हा गृप जॉईन केला. फिर्यादीने मुव्ही रिव्हींगचे वेगवेगळे टास्क पूर्ण केले व आरोपीने SK Enterprises पंजाब नॅशनल बैंक खाते क ०३७४५००२१००२१३५०९ ICICI Ne No. ३६१९००५५०००६५ यामध्ये रक्कम जमा करून घेवून एकुण ५४,५०,६३४/- रू नी त्याची फसवणूक केली.

फिर्यादी घनश्याम नरेंद्र गोविदानी, वय 32 वर्षे, व्यवसाय- बेरोजगार, रा. 802 नरेंद्र गोविंदानी आसरा अपार्टमेंट बैरामजी टाऊन, नागपूर असून आरोपींची नावे पुढीलप्रमाणे १) आकाश विनोद तिवारी वय २९ वर्ष रा. गुरूनानकनगर, घाटकोपर, मुंबई (प.) २) रवि रामनाथ वर्मा वय ३३ वर्ष रा संघर्ष नगर, चांदिवली, अंधेरी, मुंबई ३) संतोष राममनी मिश्रा वय ३९ वर्ष रा. शिवशक्ती अपार्टमेंट रूम क्र. 405, यादव नगर, गोराई नाका, नाला सोपारा (पूर्व) मुंबई ४) मित हरेशभाई व्यास वय २६ वर्षे व्यवसाय ऑनलाईन रा. फ्लॅट नं. १०२, बिल्डींग नं. बी/१, व्हाईट पॅलेश अमरोली सुरत (गुजरात) (५) अकिंत निहालसिंग टाटेर वय ३३ वर्षे रा. बिजयनगर रेल्वे स्टेशनजवळ, घर क्र. 10 विजयनगर (राज्यस्थान) 6) अरविंद महावीर शर्मा वय 24 वर्षे. गणेश मंदिराजवळ चौसाला विजयनगर (राजस्थान)

सदर गुन्हयांचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे मार्फतीने जलदगतीने सायबर तांत्रिक कौशल्याचा वापर करून राजस्थान, गुजरात व मुंबई अश्या ठिकाणी टिम पाठवून ०६ आरोपींना ताब्यात घेतले असून त्याचेकडून वेगवेगळ्या बँकेचे एकूण १९ डेबीट / केडीट कार्ड, एकूण ९ मोबाईल १ लॅपटॉप व रोख रक्कम ७,८७,५००/- रुपये असे जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपीचे वेगवेगळया बँक अकाउंट मध्ये ३७,२६,७७५/- असे फिक्स करण्यात आले आहे.

सदर गुन्हयामध्ये मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्रीमती अश्वती दोरजे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपुर शहर श्री संजय पाटील, मा. पोलीस उप आयुक्त सायबर / आर्थिक श्री अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री अमित डोळस सपोनि संदिप बागुल, सपोनि मारुती शेळके, व सर्व सायबर टिम यानी कार्यवाही केली. पोलीस ठाणे सायबर पुढील तपास करीत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles