
उमेद
घोंगावत येईल वादळवारा
संगतीला घेऊन पाऊसधारा
चिंब चिंब होईल धरणीमाय
उमेद मनाची सोडायची न्हाय
सृष्टीलाही ह्या फुटतील धुमारे
आनंदोत्सव साजरा धुंदीत वारे
हास्यकल्लोळ उडतील फवारे
उमेद मनाची सोडायची न्हाय
धरणीच्या गर्भातून उगवतील
हृदयात स्वप्नांनाही जागवतील
सुकलेल्या कळ्यांना फुलवतील
उमेद मनाची सोडायची न्हाय
सूर्यास्तानंतर होतोच सूर्योदय
अस्तानंतर होतंच असतो उदय
चंद्र सूर्यालाही असतंय ग्रहण म्हणूनच ……
उमेद मनाची सोडायची न्हाय
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर