
स्पर्श तुझा
आठवतो अजूनही
मखमली मुलायम
विश्वास पेरणारा
स्पर्श तुझा कायम
ते आश्वासक डोळे
देती लढण्याचे बळ
पडू दे कितीही देही
नियतीचे कठोर वळ
स्पर्शाची काय जादू ती
पाऊले पुढेपुढे पडती
एकेक यशोपायरी गाठत
उत्तुंग शिखरावर चढती
हरवला तो स्पर्श आता
लोपली आश्वासक नजर
काळाच्या पडद्याआड
आता गिद्ध श्वान हजर
जगणे तुझ्याविना
शिक्षाच एक आहे
श्वासाच्या लयीत राजा
तुझेच नाव वाहे
सविता धमगाये, नागपूर
=======