
वाटेवरचे काटे
जीवनाचा सहवास सुंदर
आयुष्य बहरावे दमदार
नात्याची गुंफण चौफेर
हसत रहावे सभोवार !
वाटेवरचे काटे वारंवार
नसे मी प्रगती पथावर
नशीब माझेच कमजोर
कधी कधी होतेच हार !
कुणी केले मला बेघर
वागले कसे हे कठोर
घेतली मी काय माघार
वाटेवरचे काटे बेकार!
बेतले कधी रे जीवावर
योग्यता असे शिलेदार
नशिबाचा भरे बाजार
नको जबरदस्ती फार!
वाटेवरचे काटे टोकदार
टोचतात कसे अंगावर
जिव्हारी लागतात फार
आलेले शब्द ओठावर!
करतो प्रेम मी तुझ्यावर
नाही आता कधी माघार
जरी संपली यात्रा जरूर
वाटेवरचे काटे वेचणार !
कुणाची सक्ती कुणावर
पोहचला कुणी चंद्रावर
वाटेवरचे काटे हे चतुर
टोचतात पायी निरंतर!!
अशोक महादेव मोहिते
बार्शी जिल्हा सोलापूर
========