
माघार
माघार घेतल्याने कधीच
महत्त्व कमी होत नसतं
क्षमा करायला शिकावं
मग जग आपलं भासतं
वादाने वाद नेहमीच
वाढतच जात असतो
तोडजोड केल्याने मात्र
वाद मिटून जात असतो
आनंदी राहायचं असेल
तर माफ करायला शिका
प्रगतीस अडथळे आणणारा
अहंकार लवकर विका
मोठं व्हायचं असेल तर
लहान होऊन जगावं
सर्व थोरा मोठ्यांशी
सदा नम्रतेनेच वागावं
कोणाला दुखवून माणूस
कधीच सुखी होत नाही
मग असे हे पाप कशाला
घ्यायचे आपल्या डोही
काळजी एकच असावी
दुखावणार नाही कोणी
सर्वांना सुखावणारी
मधुर असावी वाणी
आपलेच खरे म्हणून
तोऱ्यात मिरवायचं नसतं
माघार घेतल्याने कधीच
महत्त्व कमी होत नसतं
इंदुमती कदम
गंगाखेड जि परभणी