डॉ. रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली अंमळनेरला भरणार सारस्वतांचा मेळा

डॉ. रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली अंमळनेरला भरणार सारस्वतांचा मेळा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_2 ते 4 फेब्रुवारी २०२४ रोजी रंगणार संहित्यसंमेलन_

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

पुणे : दरवर्षी रंगणारा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा यंदा दि. 2 ते 4 फेब्रुवारी या कालावधीत अंमळनेर शहरी निमंत्रित सारस्वतांचा उपस्थित नेहमीप्रमाणेच रंगणार आहे. नेहमीसारखेच भरगच्च वैविध्यपूर्ण कार्यक्रम, खान्देशी अस्सल भाषेचे साहित्य वैभव उलगडणारा अनोखा कार्यक्रम, विविध विषयांचे परिसंवाद, कविसंमेलने, मान्यवरांच्या मुलाखती, शताब्दीवर्ष असणा-या साहित्यिकांचे स्मरण, असे एकापेक्षा एक खास कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमींना या ९७ व्या साहित्य संमेलनात अनुभवता येणार आहे.

अंमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात हा भव्य साहित्य महोत्सव आयोजित केला असून बालमेळाव्या पासून, निमंत्रितांच्या कविसंमेलनापर्यंतचे बहुविध संमेलनपूर्व कार्यक्रमात १ फेब्रुवारी रोजी बालमेळावा होणार आहे.

ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन उद्घाटन, ध्वजारोहण झाल्यानंतर २ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार असून दि. ३ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ साहित्यिकांची मुलाखत, दोन परिसंवाद, कथाकथन, पुस्तकावर परिचर्चा आणि खान्देश साहित्य वैभव असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम होणार आहेत. विस्मृतीमध्ये जात असलेल्या कवींच्या कवितांचे सादरीकरण सध्याच्या पिढीतील कवी सादर करणार असून, ते या कवितांविषयी भाष्य करतील.

दिनांक ४ फेब्रुवारी रोजी दोन परिसंवाद, अभिरूप न्यायालय, कवी कट्टा आणि गजल कट्टा असे कार्यक्रम होणार आहेत. दुपारी 4 वाजता समारोप सत्र होईल. एक लेखक व एका प्रकाशकाचा सत्कार करण्यात येणार आहे. ग्रंथप्रदर्शनामध्ये २५० गाळे असून, पुस्तक प्रकाशनासाठी ग्रंथप्रकाशन कट्टा करण्यात येणार आहे. प्रकाशकांना १ फेब्रुवारी रोजी सकाळी गाळे उपलब्ध होतील.

*संमेलनाच्या खर्चाचा प्रस्ताव मराठी भाषा विभागाकडे*

यापूर्वी वर्धा येथील साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाकडून दोन कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. आता अंमळनेर संमेलनासाठी संमेलन आयोजक संस्थेशी संवाद साधून किती खर्च अपेक्षित आहे याची ढोबळ माहिती देण्यात आली असून, या वर्षीच्या संमेलनासाठी अपेक्षित खर्चाचा प्रस्ताव तयार केला असून दोन कोटी रुपयांचे अनुदान आवश्यक असल्याची माहिती मराठी भाषा विभागाला दिली असल्याची माहिती अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

साहित्य महामंडळाची बैठक रविवारी पुण्यात पार पडली. यात प्रसिध्द कथाव कादंबरीकार श्री. रविंद्र शोभणे यांचीसंमेलनाध्यक्ष पदी निवड झाल्याचे जाहीर करून संमेलन तारखा आणि तीन दिवसिय कार्यक्रमाची रुपरेषा यांची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

साहित्य महामंडळाच्या कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, उपाध्यक्ष रमेश वंसकर, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा. तांबे म्हणाल्या, राजकीय व्यक्ती संमेलनाच्या व्यासपीठावर नसावेत, यासाठी महामंडळाने सातत्याने प्रयत्न केले आहेत. वर्धा येथील संमलेनात प्रकाशकांची गैरसोय झाली. ती अमळनेर संमेलनात होऊ नये, याची काळजी घेत आहोत. यंदा पुस्तक प्रदर्शन गाळ्यांची संख्या कमी केली असून, २५० गाळेच असणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles