
न्यू मून शाळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात
प्रा तारका रूखमोडे, गोंदिया प्रतिनिधी
गोंदिया: न्यू मून इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर काॅलेज अर्जुनी/मोर येथे भारतीय समाजसुधारक, लोकराजा कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
तब्बल 28 वर्ष कोल्हापूर संस्थानाचे सक्षम राज्यकर्ते म्हणून व पुरोगामी धोरण यशस्वीपणे राबविणारे, प्राथमिक शिक्षण समान पातळीवर देऊन मोफत व सक्तीचे करणारे, सनातनी वर्गाला न जुमानता दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाचे कार्य करणारे, आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता देणारे छ.शाहू महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले संस्था सचिव ओमप्रकाशसिंह पवार, व कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रा.राकेश उंदिरवाडे, प्रमुख अतिथी प्रा.तारका ‘रुखमोडे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.
प्रमुख अतिथी ओमप्रकाशसिंह पवार यांनी शाहू महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला.व मार्गदर्शन केले.राकेश उंदिरवाडे ह्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिना चचाणे यांनी केले.महर्षींच्या कार्याचा आढावा अध्यापिका भंडारी यांनी घेतला तर आभार त्रिवेणी थेर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुरज मोटघरे, देविदास बांडे, जितेंद्र कटकवार, शिला बोरीकर, कुंजना बडवाईक, हिना लांजेवार, प्रतीक्षा राऊत, आरती मुंगुलमारे यांनी सहकार्य केले.