अर्जुनी मोरगाव नगरपंचायत सभागृहाचे सिलिंग कोसळले

अर्जुनी मोरगाव नगरपंचायत सभागृहाचे सिलिंग कोसळले



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_निकृष्ट दर्जाचे काम असल्याचीमाहिती_

प्रा तारका रूखमोडे, गोंदिया प्रतिनिधी

गोंदिया: अर्जुनी/मोर तालुक्यातील निकृष्ठ बांधकामामुळे नगरपंचायतच्या नवीन सभागृहाच्या इमारतीच्या सिलिंगचा काही भाग काल २६ जून रोजी अचानक कोसळला. या अपघातातात जिवितहानी होता होता टळली

सविस्तर वृत्त असे की, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव नगरपंचायत सभागृहाच्या सिलिंग (छताचे) चे बांधकाम होऊन अवघे दीड वर्ष झाले. पण कालपासून सततच्या पावसामुळे काल सायंकाळी हे छत अचानक कोसळले. सुदैवाने त्यावेळी सभागृहात कुणीच हजर नव्हते. या घटनेमुळे सभागृहात झालेल्या छत बांधकामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

नगरपंचायत नवीन इमारतीला लागूनच ग्रामपंचायत काळातील जुने सभागृह आहे.आता ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाले. नगरपंचायतच्या कर्मचारीवृंदाची संख्या वाढली. या इमारतीत सभागृह व कार्यालयीन कामकाजासाठी वापर करणे सुरू होते. मागील नगर पंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासकराज असताना येथे बांधकाम करण्यात आले होते. काल चांगलीच पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे छत गळत होते..त्यात जमा झालेल्या पाण्याच्या ओझ्यामुळे छत कोसळल्याच्या चर्चेला गावात उधाण आले आहे .कार्यालयीन कर्मचारी यावेळी उपस्थित नव्हते.

त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण महत्वाचे प्रशासकीय दस्ताऐवज यात खराब झालेले आहेत तेव्हा निकृष्ठ बांधकाम करणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही व्हावी व प्रशासनाने यात जातीने लक्ष घालून यापुढे असे संभाव्य धोके टाळावेत अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles