नंदपूर मोहा येथे शेतीचा वाद मिटविताना हाणामारीची घटना

नंदपूर मोहा येथे शेतीचा वाद मिटविताना हाणामारीची घटना



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शहर पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल_

तालुका प्रतिनिधी, पुसद

पुसद: तालुक्यातील मोहा ग्रामपंचायतच्या हद्दीतील नंदिकेश्वर मंदिराजवळील नंदपुर येथे गावातील प्रतिष्ठित नागरिकाकडून शेतीचा वाद मिटविण्याचा प्रयत्न दि.२५ जून २०२३ रोजीच्या सकाळी ८ वाजताच्या दरम्यान सुरू होता. अशावेळी दोन्ही गटातील व्यक्तीकडून हाणामारीची घटना घडली आहे.गावातच राहणाऱ्याच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून परस्परविरोधी चौकशी अंती दि.२५ जून २०२३ ५.१० वाजता गुन्हे दाखल करण्यात आली आहे.

नितीन श्रीराम राठोड वय २९ वर्षे रा.नंदपुर (मोहा) यांनी दिले तक्रारीवरून गावातच राहणाऱ्या आनंदा दिवानी जाधव वय ६० वर्षे व त्याच्या पाच साथीदाराविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.तर सिनेश आनंदा जाधव वय ३५ वर्षे रा.नंदपुर यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीराम चतृ राठोड वय ६० वर्षे व त्याच्या दोन साथीदारा विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.शहर पोलीस स्टेशनच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेतीचा वाद मिटला जात असताना गावकरी मंडळींमध्ये सही देण्याच्या कारणावरून वाद निर्माण केला होता.त्यानंतर दोन्ही मंडळी कडून लाठीने काठीने व दगडाने मारहाण करून जखमी केले.सोबतच मध्यस्थी करणाऱ्यालाही लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. अशावेळी दोन्ही गटाच्या मंडळींकडून जीवाने ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles