
‘कास्ट्राईब शिक्षक संघटनेची शिक्षण आयुक्तासोबत बैठकीची मागणी’; प्रमोद मुरार
पुणे: कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्याची बैठक मा शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासोबत लावण्याची मागणी शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस सतीश कांबळे वं मराठवाडा विभागाचे अध्यक्ष राजेश सदावर्ते यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी लावून धरली.
महाराष्ट्र राज्यात मागासवर्गी्य कर्मचारी वं शिक्षक यांचे अनेक प्रश्न / समस्या काढण्यासाठी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र बीसीसी 2011 पृ. क्र.455/11/16 वं मंत्रलंय मुबई 400032 दिनांक 3 मे 2011 च्या शासन निर्णयानुसार बैठक लावण्याची मागणी केली.
अनेक दिवसापासून कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सेवाविषयक प्रश्न प्रलंबित आहेत
1) बिंदू नामावली प्रमाणे प्राथमिक शिक्षकांची सरळ सेवा भरतीची रिक्त पदे भरणे
2) मुख्याध्यपक व विस्तार अधिकारी यांना वर्ग मध्ये पदोन्नती करण्याबाबत
3) प्रा शिक्षकांचे ऑनलाईन जिल्हातर्गत आंतरजिल्हा बदली धोरण कायम ठेवण्याबाबत.
4) केंद्र प्रमुख परीक्षेस बसण्यासाठीची 50 पेक्षा अधिकची अट व 50 पेक्षा अधिक ची वयाची अट रद्द करणे,
5) वैद्यकीय बिले, सातवा वेतन आयोग मधील दुसरा वं तिसरा हप्ता जमा करणे,10-20-30 वर्षाची आश्वासित प्रगती योजना वेतनश्रेनी मंजूर करणे, केंद्र प्रमुख वं मुख्याध्यापक यांना रजा रोखीकारण लागू करणे, मुख्यालयी राहत असणेबाबतची अट रद्द करणे, सर्व जिल्ह्याची बिदु नामावली अपडेट करणे या सह विविध मागण्या वं समस्याचे मूलभूत प्रश्न सोडविण्या संदर्भात बैठक लावण्याची मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस सटीश कांबळे व मराठावाडा विभागीय अध्यक्ष राजेश सदावर्ते यांनी केली.