
‘अन्यथा… भिडे गुरूजीच्या धोतरात साप सोडू’
सोलापूर: भिडे गुरुजीवर गुन्हा दाखल करून अटक करा, प्रहारने जाळली भिडे गुरुजीची प्रतिमा, भिडे गुरुजींनी 15 ऑगस्ट रोजी भारताचा तिरंगा फडकवला नाही तर भिडे गुरुजींच्या धोतरात साप सोडण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला.
सतत वादग्रस्त विधान करून दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि राष्ट्राचा अपमान करणारी वक्तव्य करून देशद्रोह करणाऱ्या भिडे गुरुजी यांचेवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावे या मागणी साठी प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या सोलापूरच्या वतीने भिडे गुरुजी यांची प्रतिमा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी भिडे गुरुजी यांचा समाचार घेत त्यांचेवर जोरदार प्रहार केलं. जर भिडे गुरुजींनी 15 ऑगस्ट रोजी भारताचा तिरंगा फडकवला नाही तर भिडे गुरुजींच्या धोतरात साप सोडल्याशिवय राहणार नाही असा इशारा या प्रसंगी दिला.