कास्ट्राईब शिक्षक संघटना परभणीचे पदाधिकारी प्रकाश पंडित व देवानंद फुलवरे या शिक्षकांचे सेट परीक्षेत घवघवीत यश

कास्ट्राईब शिक्षक संघटना परभणीचे पदाधिकारी प्रकाश पंडित व देवानंद फुलवरे या शिक्षकांचे सेट परीक्षेत घवघवीत यशपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

प्रकाश पंडित व देवानंद फुलवरे यांचा राज्य कार्यकारणीतर्फे होणार औरंगाबादेत भव्य सत्कार

परभणी: कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे परभणी तालुकाध्यक्ष प्रकाश पंडित व तालुका सरचिटणीस देवानंद फुलवरे, या दोघांनीही नेट सेट परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून, शिक्षकासाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे लवकरच औरंगाबाद येथे आयोजित होणार असलेल्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत भव्य सत्कार करण्यात येणार आहे.

दोघांचेही अभ्यासू नेतृत्व असून, ते आदर्श शिक्षक उच्च विद्या विभूषित, सामाजिक कार्याची जाण असणारे शिक्षकी पेशात असूनही विज्ञानावर आधारित अनेक प्रयोग करून विद्यार्थ्यांबरोबर समाजाला दिशा देणारे आहेत. कास्ट्राईब शिक्षक संटनेत तालुका अध्यक्ष परभणी व तालुका सरचिटणीस प्रकाश पंडित व देवानंद फुलवरे हे अविरतपणे कार्य करीत आहे. सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या समोर एक आदर्श निर्माण केलेला आहे व समाजाला सेवेत राहूनही शिक्षण घेऊन उच्च विद्या विभूषित कसे व्हावे हे दाखवून दिले.

यासाठी आपले दोघांचे आदर्श नेतृत्व समाजासमोर एक दिवस निश्चित आदर्श ठरेल याचबरोबर आपणास आपल्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य परिवार आपल्या या यशामध्ये सहभागी आहे. आपल्या या नेत्र दीपक दैदिप्यमान यशास व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

कास्ट्राईब शिक्षक संघटना राज्य कार्यकारणी महाराष्ट्र राज्यच्या वतीने राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे, राज्य @कार्याध्यक्ष भारत धुरंधर, राज्य सरचिटणीस सतीश कांबळे,राज्य उपाध्यक्ष विजयकुमार जाधव, राज्य मुख्य संघटक परसरामजी गोंडाणे, ओमप्रकाश वासनिक, वर्धा जिल्हा अध्यक्ष प्रमोद मुरार, राज्य प्रसिद्धी प्रमुख राहुल पाटील भीमराव तुरुकमाने, नागसेन धनवे, राजकुमार घेडेस्वार, नरेंद्र मोरे, संदीप कदम, शीतलकुमार वानखेडे, सुभाष गायकवाड, प्रभाकर पारवे,शशिकांत गायकवाड, अविनाश वाकोडे, दादारावं भोंगळ, विभागीय अध्यक्ष संदीप गाडे, राजेश सदावर्ते, अरुण सावंग, प्रमोद घोंगडे, महेश अहिरे, बापू साळुंखे, प्रकाश कांबळे, अशोक गायकवाड, मायादेवी गायकवाड, दिलीप खंडारे, ओंकेश बनसोडे, हेमंत तायडे, उमेश फुलमाळी आदिसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी या दोघांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles