
‘अब की बार ‘सिंघम’ सरकार’; दुबई शेखरच्या एंट्रीने राजकीय नेत्यांची पंढरी घाबरली
नागपूर: ‘दुबई शेखर’ च्या पक्षातील १८ जणांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून बी आर एस ला खिंडार पाडले असले तरी, मागील काही महिन्यात भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसने महाराष्ट्रात जोरदार प्रवेशासाठी सभा, कार्यक्रम सुरू केले आहेत. अब की बार ‘सिंघम सरकार’ असे तथाकथित ब्रीद घेउन ‘दुबई शेखर’ महाराष्ट्र दर्शन करतांना दिसत आहे. तुम मुझे वोट दो मै तुम्हे मुख्यमंत्री बनाता हू’ अशा वल्गना कितपत फायद्याच्या ठरतील हे ‘विठ्ठल जाणो’ परंतु तेलंगणाचे सिंघम यांनी महाराष्ट्रातील नेत्याच्या बुडाला आग नक्की लावली अशा राजकीय क्षेत्रात चर्चा सुरु आहे. पूर्वी शेखर राव दुबई ला बेरोजगारांना कामाला लावायचे म्हणून त्यांना दुबई शेखर ही पदवी बहाल केल्याचे ऐकीवात आहे.
सिंघम यांनी सुरवातीला मराठवाड्यामध्ये सभा घेतल्या. शेतकऱ्यांचे सरकार ही घोषणा मराठवाड्यात त्यांनी करून आपण केवळ शेतकरी हितासाठी काम करणार, असे उघडपणे जाहीर केले.
बीआरएसचे धोरण हे शेतकरी मुद्द्यावर काम करण्याचे असल्याने अर्थातच शेतकरी संघटनेशी संबंधित किंवा शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणाऱ्या नेते मंडळींनी उघडपणे बीआरएसची बाजू घेतली. पश्चिम महाराष्ट्रात केसीआर यांनी हीच भूमिका कायम ठेवत असताना विठ्ठल दर्शनाच्या सोहळ्याचा मुहूर्त गाठला.
शेतकरी संघटनेनंतर राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र किसान आघाडीचे नेते शंकरअण्णा धोंडगे यांनी जेव्हा या पक्षात प्रवेश केला तेव्हाच बीआरएसच्या शेतकरी हिताचे मुद्दे केवळ गप्पा नाहीत तर ते तेलंगणात राबवले गेले आहेत. कारण शंकरअमणणा धोंडगे मागील अनेक दशकापासून शेतकरी चळवळीत संघर्ष करत आहेत.
त्यांच्यासारख्या शेतीबद्दल अभ्यास असलेल्या नेत्याला तेलंगणातील शेती विकासाचा आलेला अनुभव समजून घ्यावा लागेल. त्यानंतर किसान सरकारची घोषणा घेऊन पश्चिम महाराष्ट्रात केसीआर नेमके काय करणार अशी उत्सुकता लागलेली होती. पंढरपुरात सर्व महाराष्ट्रातील वारकरी व शेतकऱ्यांचे दैवत श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन त्यांनी एन्ट्री केलीच. पण ही एंट्री देखील सिंघम स्टाईलची होती असे म्हणायला हरकत नाही.पण दुबई शेखरच्या एंट्रीने राजकीय नेत्यांची पंढरी घाबरली