बालगंधर्व एकपात्री पुरस्काराने कल्पना देशपांडे गौरवान्वित

बालगंधर्व एकपात्री पुरस्काराने कल्पना देशपांडे गौरवान्वित



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

पुणे: दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त
आयोजित करण्यात येणारा ” बालगंधर्व रंगमंदिर महोत्सव” नुकताच संपन्न झाला असून या महोत्सवात कलेसाठी समर्पित विविध कलायात्रींना “बालगंधर्व” पुरस्काराने गौरविण्यात येते. त्यानुसार
यंदाचा 55 व्या वर्धापनदिनी बालगंधर्व एकपात्री कलाकार पुरस्कार पुण्याच्या प्रसिद्ध एकपात्री कलाकार, कल्पना देशपांडे यांना जाहिर झाला आहे. बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मा. मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

कथाकथनकार आणि लेखिका कल्पना देशपांडे यांनी महाराष्ट्रासह परराज्यात व देशविदेशातआपले एकपात्री कार्यक्रम सादर केले आहेत. त्यासाठी त्यांना आजपर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘अस्सा नवरा’ हा त्यांचा एकपात्री खूपच गाजला असून त्याचे आजपर्यंत असंख्य प्रयोग झाले आहेत.

याप्रसंगी बोलताना कल्पना देशपांडे म्हणाल्या, ” बालगंधर्व यांच्या नावाचा हा पुरस्कार म्हणजे, नटराजाची कृपा आणि माझ्या कलेवर भरभरून प्रेम करणाऱ्या रसिकांचा आशीर्वाद आहे, हा पुरस्कार मी त्यांनाच अर्पण करते. माझे कुटूंब आणि एकपात्री कलाकार मंच यांचा पाठींबा असल्यानेच मी माझी कला सादर करू शकले. ” अशा शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समारंभास बालगंधर्व परिवाराचे सर्व सदस्य व कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर कलावंत उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles