
“आपले आमदार आपल्या दारी” अभियानास प्रारंभ
_आमदार सिध्दार्थ शिरोळेंचा जनतेशी संवाद_
_अमृता खाकुर्डीकर पुणे प्रतिनिधी_
पुणे: भारतीय जनता पक्षाच्या वतीने सध्या सर्वत्र जनसंपर्क अभियान सुरू असून याच अनुषंगाने “आपले आमदार आपल्या दारी” ह्या उपक्रमा अंतर्गत शिवाजीनगर भागाचे आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी गोखले नगरमधील निलज्योती हौसिंग सोसायटी या वसाहतीमधील जनतेशी मनमोकळा संवाद साधला. वसाहतीतील नवयुग मित्रमंडळ व येथील सामाजिक कार्यकर्ते पुणे शहर भाजप उपाध्यक्ष योगेश बाचल यांच्या वतीने या संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
वेताळ टेकडी आणि चतुःशृंगी डोंगराच्या नजिक असलेल्या या वसाहतीजवळ वनखात्याच्या अधिनस्त येणारा राखीव फाॅरेस्ट एरिया आहे. त्यानुसार आणि पाणी,कचरा इ. सामान्य नागरी समस्यांसह आपल्या अशा काही समस्या या सोसायटीला भेडसावत असतात. त्यापैकी मुख्यतः पोलीस सुरक्षा, वीज वितरण व्यवस्था, पीएमपीएल बसेस,अश्या अनुषंगिक अनेक समस्यां नागरिकांनी आमदारांसमोर पोटतिडकीने मांडल्या. आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी देखिल नागरिकांशी मुक्तपणे संवाद साधला. याच संवाद कार्यक्रमातूनच आमदार महोदयांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना फोन लावून नागरिकांच्या समस्याबद्दल माहिती देऊन त्या मार्गी लावण्यासंदर्भात सुचना केल्या.
या संवाद कार्यक्रमामुळे निलज्योतीच्या एल आय जी , एम आय जी, एच आय जी या ईमारतींमधील ज्येष्ठ सभासद शिवदास भोसले, अशोक भारंबे, विवेक कुलकर्णी, विकास राऊत यांनी अनेक समस्या मांडल्या.त्यास आमदार महोदयांनी समाधानकारक उत्तरे देतील. परिसरातील सर्व रहीवाश्यांनी या संवाद कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आणि आमदार महोदय असाच संपर्क ठेवून समस्या सोडवण्यास मदत करतील असा विश्वास दर्शवला.