शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : जीव माझा गुंतला☄*
*🍂शनिवार : ०३/ जून /२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*जीव माझा गुंतला*

अवचित हे स्वप्न जागले
त्या स्पर्शात मी मिटले
काय घडले काही कळेना
रंगात त्याच्या मी रंगले

भूमीवरी पाऊल पडेना
मना लागले असे पिसे
भाववेड्या माझ्या मनाला
आता आवरु मी कसे

गात्रांत चैतन्य चेतले
क्षण क्षण उत्सव झाला
तोची गंध कस्तुरीचा
अंगभरी मी लपेटला

फुलाफुलांत फुलूनिया
मीच आता फूल जाहले
त्याच्या अस्तित्वाच्या खुणा
जळीस्थळी शोधू लागले

निळे आभाळ पांघरूनी
ओढाळ स्पर्श शोधते
लाजताना मी आता
नभी चांदणी ही लाजते

तोच नाद बासरीचा
दूर वेळूतून घुमला
त्या धुंद स्वरलहरीत
हा जीव माझा गुंतला

निळ्या सावळ्याचे गारुड
माझ्या अंगभरी पसरले
मीच सावळ्याच्या आता
शिरी मोरपीस शोभले

मना लागे निळी चाहूल
अंगांग हे मोहरले
अंतर्यामी तो झिरपत गेला
मीच कान्हा जाहले

*रचना*
*वृंदा(चित्रा)करमरकर*.
*मुख्य* *मार्गदर्शक* *परीक्षक*
*सहप्रशासक*
*सांगली जिल्हाः सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
💟💚💟💚💟💚💟💚💟💚
*जीव माझा गुंतला*

जीव माझा गुंतला रे
सख्या तुझ्या जीवात
बंधन तुझे माझे हे
तुटे ना सात जन्मात

दोन काया एक जीव
असे तुझे माझे नाते
तुझ्या संगती आनंदाचे
प्रीत तराणे. मी गाते

सुख दुःख वाटेकरी
वास तुझा अंतर्मनी
अस्तित्व तुझे जपले
क्षणोक्षणी जीवनी

सावित्रीचा वसा मी
जपुनिया क्षणोक्षणी
यमराजा हरविण्या
होईल तुझी संजीवनी

जीवनाच्या प्रत्येक क्षणी
साथ तुझी अनमोल
जीव गुंतला तुझ्यात
अंतरीचे आहे बोल

*श्रीमती सुलोचना लडवे*
अमरावती
*सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
💟💚💟💚💟💚💟💚💟💚
*जीव माझा गुंतला*

निरर्थक जीवनात माझ्या
तुझ्या प्रेमाने वसंत बहरला
मलाच विसरून गेलो मी
जीव माझा गुंतला….
बघण्यास तुझे रुप देखणे
जीव माझा आतुरला
प्रेमाचा जणू अर्थ
आज मला उमगला
जीव माझा गुंतला…
मूक झाली ओठांची भाषा
बोलू लागली नजर
तुझ्या प्रीती सवे
आयुष्याला आला बहर
आठवणीत तुझ्या दंगला
जीव माझा गुंतला…..….
दिवसा मागून दिवस जातील
संपेल तपांचा काळ
आपल्या आयुष्यात नेहमी
उगवेल सुखाची सकाळ
स्वप्नांना रंग प्रेमाचा चढला
जीव माझा गुंतला………
तू माझी मी तुझा हा
एकच सुर गवसला
नित्य जगण्याला जणू
नवा अर्थ प्राप्त झाला
जीव माझा गुंतला………

*सौ. स्नेहल संजय काळे*
*फलटण सातारा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
💟💚💟💚💟💚💟💚💟💚
*जीव माझा गुंतला*

जीव माझा गुंतला प्रेमात तुझ्या
नि झालो पुरता बेहाल सखे…

तू गुलाबापरी सुंदर गं
मला समजते बंदर गं
सदैव फिरती गाडी तू
मी केवळ उभी माडी गं…

धगधगती तू आग गं
मी केवळ उभा साग गं
घराची सत्ताधारी तू
मी नोकरदार भिकारी गं…

समृद्धी महामार्ग तू
गावातला मी रस्ता गं
सदैव तुझी भटकंती
मी खातो केवळ खस्ता गं…

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
💟💚💟💚💟💚💟💚💟💚
*जीव माझा गुंतला*

रात्रंदिन मला आता सारखाच वाटतो
जीव माझा गुंतला तुझ्यात वाटतो

तुझा तो नयन कटाक्ष भिडतो हृदयाला
अन तनात माझ्या प्रेमाचा तरंग उठतो

करून टाक नजरकैद हृदयात दे जागा
मनात माझ्या सखे शीतल झरा वाहतो

का करते असा विचार बोलून टाक मनातले
मी तुला आज क्षितिजावर भेटतो

जीव तुझा माझा एकरूप होऊन जावू दे
मग मी प्रीतीचा किनारा गाठतो

*डॉ. संजय भानुदास पाचभाई, नागपूर. सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
💟💚💟💚💟💚💟💚💟💚
*जीव माझा गुंतला*

आई जीव माझा गुंतला
तुझ्यात ग अजूनी
बंध मायेचे गेलीस तोडूनी
बेहोशिने अश्रु जाती ढळुनी ॥

पारखी मी आईच्या प्रेमास
मन होई सारखे उदास
चुटपुट लागते मनास
आठवणीने होतो तव भास ॥२॥

सांजवेळी एकाकी वाटते
झुल्यावरी झुलता मन झुरते
साश्रु नयन आसवात डुंबते
तूं नसण्याने मन खंगावते ॥३॥

आठवणींत मन गुटमळते
हळहळते गहिवरते वेडावते
निरागस मन वाट बघते
वाटेकडे डोळे लावते ॥४॥

तव आभासात मन जाते बुडुनी
स्पर्शाच्या खूणा जाशी ठेवूनी
नयनीच्या एक थेंब अश्रुंत
नव-कोट दृष्टांत देशी दावूनी ।५॥

*© श्रीमती श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
💟💚💟💚💟💚💟💚💟💚
*जीव माझा गुंतला*

जीव माझा गुंतला
विठ्ठला तुझ्या नामात
लागे ना कुठेच मन
दंग झालो सावळ्या रूपात

हरीनामाच्या भजनाने
तृप्त झाली ही वाणी
सुखाचे येती ढेकर
देहाची विसावली ग्लानी

शरण येता मी भगवंता
चरणी देह सारा वाहिला
शुद्धी झाली अंतरंगाची
भक्तीचा मेळ हा जुळला

संचारुनी येई हृदयी
जीवाला लाभला श्वास
मायेची सुखद सावली
सभोवताली तुझाच भास

वैकुंठ नायका घेरे पदरी
भक्तीत निरंतर गुंतू दे
लोचणी राहो तुझी काया
हाच आशीर्वाद असू दे

*कुशल गो. डरंगे, अमरावती*
*@सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
💟💚💟💚💟💚💟💚💟💚
*जीव माझा गुंतला*

जीव हा गुंतला तुझ्यात
पडलो सहज मी प्रेमात
बोलतो तुझ्याशी झोपेत
देशील हाती दोन हात !

हवी मला तुझी सोबत
मनी पेटविली तू ज्योत
दिसते मला आरशात
सौंदर्य तुझं भरे मनात!

जीव माझा ग गुंतला
तुझ्या दोन डोळ्यात
भेटूया दोघे कदाचित
चर्चा हवी एकांतात!

काय तुझ्या ग मनात
हळुवार सांग कानात
शुद्ध भावना हृदयात
जगतो स्वप्न हे पहात!

हिरवी साडी अंगात
गोड हसतेस गालात
पाही तुला डोळ्यात
बोलू थोडं ग प्रेमात!

असत्य नव्हे हकीकत
आनंद खरे बोलण्यात
जीव माझा ग गुंतला
तुझ्या सुंदर सौंदर्यात!!

*श्री अशोक महादेव मोहिते*
बार्शी जिल्हा सोलापुर
*सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
💟💚💟💚💟💚💟💚💟💚
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*जीव माझा गुंतला*

सागर लाटामधली तू
सळ सळ तार गं
पाहूनी मी तुजला
झालो वेडा गं….

तुझ्याच फेसाळ लाटा
चम चमती धार गं
माणिक मोती पवळे
रंगीबेरंगी खडे गं…

अनमोल खाण सखे
मी चालवतो न्हाव गं
विहारामधून पाहतो
तुझा सारा गाव गं….

शांत किनारा असा
डोळे फोडून राहतो गं
रण वाळूचे मैदान
शिखर चढतो गं…

प्रेमाची झालर नवी
पांघरूणी जरा घे गं
खुणावनी डोळ्याला
जीव माझा गुंतला गं..

*शिवाजी नामपल्ले*
अहमदपूर जि.लातूर
*सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
💟💚💟💚💟💚💟💚💟💚
*जीव माझा गुंतला*

“जेव्हा तू माझी झाली,
तेव्हा जीव माझा गुंतला ”
“प्रत्येक सुख दुःखात
जीव एकरूप जाहला ”

“नाही कधी विसरलो
तुझ्या श्वासात रमलो ”
“तुझ्या प्रत्येक मागणीला
नाही कधीच दमलो ”

“जशी सावित्री पतिव्रता
तसा मीही एकपत्नी वचनी”
“स्वभातला मधुर गोडवा
पडतो दोघांच्याही पचनी ”

” तू दरवर्षी वटपौर्णिमेला
वडाची पूजा नेहमी करतेस ”
“माझ्यासाठी दीर्घायुष्य मागून
माझी मनोभावी सेवा करतेस ”

“तुझ्यासाठीही दीर्घायुष्य
मिळो अशी मी प्रार्थना करतो ”
“आपला एकमेकात जीव
आयुष्यभर गुंतत असतो ”

*✍️ श्री हणमंत गोरे*
*मुपो घेरडी, ता :सांगोला,* *जि :सोलापूर*
*(©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह )*
💟💚💟💚💟💚💟💚💟💚
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles