
घन बरसून आले
गारवा झोंबला बोचरा
आभाळ भरुन आले
सृष्टी अंकुरली नवी
घन बरसुन आले
चिंब जलधारा खुशीत
नभ मोहरून आले
धराही नाचे मजेत
घन बरसुन आले
सुगंधित वाटा चिखली
मन आनंदुन आले
जन्मती बीजे माळरानी
घन बरसुन आले
आठव सुखद भिजता
दवबिंदु मोती झाले
तुला आठवुन पाहता
घन बरसून आले
ऊर्मी घरत, पालघर
=======