
ओझे अपेक्षांचे
सुखाची आस तर
मी सोडली केव्हाच
दु:खांना कुरवाळायला
मनात ठरविलं तेव्हाच
सुख म्हणजे काय तर
मृगजळात गुरफटणे
नि दु:ख दु:ख म्हणून
आयुष्य त्यातच संपवणे
दु:खांना सामोरे जावून
मार्ग काढण्याचा आनंद परमोच्च
त्यातच तर उलगडते
अपेक्षांच्या ओझ्यांचं रहस्य
सुख म्हटलं तर
अपेक्षांच्या मागे धावत सुटणे
नि ते ओझे होतं जेव्हा भारी
काळोखाच्या गर्तेत रुतणे
मग कां दबून जावं
अपेक्षांचे ओझे ठेवून
सुखांना मर्यादित ठेवावं
अपेक्षांना कवटाळून
हंसराज खोब्रागडे
अर्जुनी/ मोर, गोंदिया
======