
बेबनाव
बसली होती बाकावर
आजूबाजूला गर्दी दाट
मन होई कावर बावर
मी पहात होते वाट
काय करावे सुचे नासे
समाजात वावरताना
संवाद घडता घडता
होऊन द्यावा बेबना
बेबनावाचे बिनधास्त क्षण
अंतर्मनात रुजतात खोल
मूक कमलावर गोड स्मित
दर्शवतात आनंदाचे मोल
कटाक्षाने पाळावी नेहमी
विशिष्ट अशी जीवनशैली
नकळत भरत जाईल बघा
नित्यनव्या आनंदाची थैली
जास्त अपेक्षेचा नसेल भार
नको दडपणाखाली शरीर
हिरमुसून संपवते हा बेबनाव
जरी झाला थोडा उशीर
सारुनी दूर निराशेची छटा
द्यावी स्वतःलाच नवी संधी
पसरावी चौफेर सुवर्ण लाली
होईल सुखाची पहाट आधी
कुसुम पाटील, कसबा बावडा कोल्हापूर
=========