माझे ऐक ना..

माझे ऐक ना..पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

माझे ऐक ना म्हणत ,
साक्षी विनवणी करी
पण ऐकले ना काहीही
खुन सवार डोक्यावरी

प्रवीणने धोका दिलाय
म्हणून ब्रेकअप घेतला
मैत्री होती कि प्रेम तुझे ,
नाही माहिती मजला..

म्हणत म्हणत साहिल
साक्षीला रस्त्यात गाठले
अन् काहीही न बोलता
सपासप चाकूने भोसकले

वर्षभरा पुर्वी प्रवीणने ,
होते मैत्रीचे ब्रेकअप केले
मग प्रवीणच्या नावाचे
टेटू का शरिरावर गोदवले

एवढाच होता निमित्य
राग येण्यासाठी साहिलला
धोकेबाजी केली म्हणून..
पाठवला यमसदनी साक्षीला

हा कसला प्रेम होता ?
का कळलं नाही साहिलला
क्षुल्लक कारणासाठी
प्रियशीचा रे जीव घेतला

चंदू डोंगरवार अर्जुनी मोर,जि गोंदिया
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles