
माझी माय
माझी माय माझ्यासाठी
आहे ईश्वराचं रुप
संस्काराचे दिले दान
शिकवण दिली खूप
मांगल्याची मूर्ती आहे
ममतेचे रुप माय
हंबरते पिलासाठी
जणू गोठ्यातली गाय
गरीबीचं जीणं माथी
अंगी आहे स्वाभिमान
माणूसकी भरलीसे
सान थोरा देई मान
ठिगळाने ती जोडते
फाटक्याच संसाराला
तिच्या ठायी असे बघा
मोठेपणा आधाराला
भूक पोटात घेऊन
माय राबे दिनरात
जणू प्रकाश देणारी
दिव्यातली सांजवात
फाटक्याच पदरात
रुप तिचं निखरते
गरीबीत जगताना
स्वतःलाही सावरते
डॉ.सौ.मंजूषा साखरकर
ब्रह्मपुरी, जि चंद्रपूर
=======