लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये क्रूरता; महिलेचे तुकडे करून,कुकरमध्ये शिजवून कुत्र्याला खाऊ घातले

लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये क्रूरता; महिलेचे तुकडे करून,कुकरमध्ये शिजवून कुत्र्याला खाऊ घातलेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: मीरा रोड परिसरातील एका सोसायटीतून महिलेचा मृतदेह सापडला आहे. महिलेचा मृतदेह अनेक तुकड्यांमध्ये सापडला आहे. महिलेचा गळा चिरून खून करण्यात आला. तपासात महिलेचे नाव सरस्वती विद्या असे सांगितले जात असून ती तिचा लिव्ह इन पार्टनर मनोज साने याच्यासोबत राहत असल्याचे पोलिसांना आढळून आले. लिव्ह इन पार्टनरचे वय ५६ वर्षे आहे. ही हत्या ४ जून रोजीच झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोघेही आकाशगंगा भवनमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये ३ वर्षांपासून राहत होते. संशयाच्या आधारे पोलिसांनी महिलेचा लिव्ह इन पार्टनर मनोज साने याला अटक केली आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.

मीरा रोड खून प्रकरणात सुत्राच्या माहितीनुसार मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवल्याची मोठी माहिती समोर आली आहे. आरोपींनी महिलेच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले. मीरा रोड परिसरात असलेल्या सोसायटी फ्लॅटमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेचे तुकडे तुकडे करण्यात आले. लोकांनी फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली. पोलिसांनी फ्लॅटमधून मृतदेह ताब्यात घेतला.

*लग्नाशिवाय 3 वर्षे एकत्र राहत होते*

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे वय अंदाजे 32 वर्षे होते. ती एका 56 वर्षीय व्यक्तीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. दोघेही ३ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. 4 जून रोजी महिलेचा खून झाल्याची शक्यता आहे. मात्र, हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

*असा या प्रकरणाचा भंडाफोड झाला*

मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडवर असलेल्या गीता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील सोसायटीच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटमधून एका महिलेचा अनेक तुकड्यांमध्ये मृतदेह पोलिसांना काल रात्री आठच्या सुमारास सापडला. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार रहिवाशांकडून प्राप्त झाली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles