राष्ट्रवादी काँगेसचा बहुजन समाजाच्या कर्मठ कार्यकर्त्यावर अन्याय

राष्ट्रवादी काँगेसचा बहुजन समाजाच्या कर्मठ कार्यकर्त्यावर अन्याय



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_प्रविण खाडे माजी तालुका अध्यक्ष राकापा_
हिंगणा: राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या हिंगणा तालुका अध्यक्ष या पदावर मागील ५ ते ६ वर्षापासून प्रविण पंढरीनाथ खाडे (पाटील) कार्यरत आहे. ज्यावेळी राज्यात व देशात भाजपाची सत्ता असतांना हिंगणा तालुक्यातील व राज्याचे माजी मंत्री श्री. रमेशचंद्र बंग साहेब यांचे जवळची व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मातब्बर मंडळी पक्ष सोडून गेली तेव्हा पक्ष संकटात असतांना तसेच पक्षात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली असतांना कोणीही पक्षाचा तालूका अध्यक्ष व्हायला तयार होत नव्हता. अशावेळी पक्षाचा तालुका अध्यक्ष होवून वर्ष २०२०-२१ ला तालुक्यात ३ जिल्हा परिषद व ८ पंचायत समिती सदस्य नव्याने निवडून आले आहे.

आम्ही तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम प्रामाणिकपणे केले व संपूर्ण तालूका पिंजून कार्यकर्त्यांना बळ दिले हे या तालूक्यातील सर्वांना माहिती आहे. पंरतू माझे चांगले काम असतांना व सर्वसामान्य जनतेला वेळ देत असतांना मला कोणतीही कल्पना न देता श्री. बंग साहेब यांनी वरीष्ठांकडे आग्रह करुन मला तालूका अध्यक्ष पदावरून बरखास्त केले. त्यांनी मला सांगीतले असते की, राजीनामा दे तर मी राजीनामा दिला असता. दिनांक १०/०६/२०२३ रोजी बाबडे सभागृहात पक्षाचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आम्हाला निमंत्रण दिले नव्हते. हा पक्षाचा कार्यक्रम असुन त्यांचे घरचा कार्यक्रम मुळीच नव्हता.

आम्ही तालुक्यात पक्ष बळकट करीत असतांना ना कधी गाडी, ना कधी डिझेल-पेट्रोल व इतर संसाधनाचा पूरवठा येथील श्री. बंग साहेबांनी कधीही केलेला नाही. आम्ही कार्यकर्त्यां सोबत पक्षाचे अनेक आंदोलने व मोर्चे काढले. वेळेप्रसंगी रस्त्यावर बसून आंदोलने केली याकरीता आमचेवर गुन्हे देखील दाखल झाली आहे. आम्हालाही दुस-या पक्षाकडून आमिषे प्रलोभने मिळाली होती. पंरतू पक्ष संकटात असतांना आम्ही पक्षाशी बेईमानी किंवा धोका केलेला नाही.

आम्ही तालुका पातळीवर नेतृत्व करीत असल्याने व बहूजन विशेषतः कुणबी समाजातील असल्याने येथील नेते श्री. बंग साहेब हे आमचे नेतृत्व मोठे होवू नये याकरीता राष्ट्रवादीचे कार्यकर्त्या मध्ये संभ्रम निर्माण करीत आहे. हिंगणा येथील स्थानिक लोकांना राजकीयदृष्टया मोठे होवू द्याचे नाही. मी तालुका अध्यक्ष असुनही माझी पत्नी सौ.रुपाली खाडे ही पंचायत समिती सभापती होवू नये याकरीता यांनीच प्रयत्न केले. आजही आम्ही पक्षातच असून वेळप्रसंगी घरी बसू पण खोटे राजकारण करणार नाही. श्री. आशिष पुंड यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष करण्यासाठी यांनीच विरोध केला होता याची सर्वांनाच माहिती आहे. पक्षातील प्रामाणिक कष्ट करणा-या व पक्षासाठी प्रामाणिकपणे राबणा-या, सतत मेहनत करणा-या, प्रसंगी पक्षासाठी अंगावर गुन्हे घेणा-या आमच्या सारख्या बहूजन समाजीतील प्रामाणिक कार्यकर्त्यांवर श्री. बंग साहेब अन्याय करीत आहे. आम्ही पक्षाचे आंदोलने, मोर्चे काढले असता श्री. बंग साहेब हे आम्ही करीत असलेल्या आंदोलने, मोर्चेला जावु नका अशा सुचना पक्षातील इतर लोकांना देवून संभ्रम निर्माण करतात.

श्री. जयंतरावजी पाटील साहेब प्रदेशअध्यक्ष यांना विधानसभेतून निलंबित केल्यानंतर निषेध आंदोलना करीता आम्ही आंदोलने केली परंतू याची श्री. बंग साहेब यांनी या आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. मा. खासदार सुप्रियाताई सुळे यांचेबाबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल यांचे विरुध्द आंदोलनातही श्री. बंग साहेब यांनी साधा सहभागही नोंदविला नाही. म्हणजेच पक्षाचे वरीष्ठ नेत्यांसंबंधी निषेधार्ह आंदोलन व इतर आंदोलने यात श्री. बंग साहेब मदत करीत नाही. ते स्वतः कोणत्याही आंदोलनात न येता बाकी लोकांनाही जावू देत नाही याची पक्षाचे वरीष्ठ नेत्यांनी दखल घ्यावी. ते तालूका ते जिल्हा पातळीवरील नेत्यांना नेहमीच त्रास देतात. त्यांच्या चुकीच्या तक्रारी वरिष्ठांकडे करतात. पंरतू स्वतः काहीही करीत नाही. मी म्हणेजच पक्ष या अडेलतट्टू, दुट्टपी, अहंकारी व हुकुमशाही धोरणामुळे आपले पक्षाचे जिल्हा संघटक श्री. प्रदिप ठाकरे यांनी आताच शिवसेना ( एकनाथ शिंदे) या पक्षात पक्षांतर केले. यापूर्वी त्यांच्या भाऊसुन सौ. सुचिता विनोद ठाकरे जिल्हा परिषद सदस्या डिगडोह ता. हिंगणा यापूर्वीच पक्षाला सोडून भाजप मध्ये गेल्यात. तसेच सौ.सोनाली योगीराज पराते माजी ग्राम पंचायत सदस्या यांचे पती योगीराज पराते व श्री. बंग यांचे यापूर्वीचे ड्रायव्हर व ग्रामपंचायत सदस्य श्री. संजय पटले व इतर सहकारी जानेवारी-फेब्रुवारीत २०२३ ला पक्ष सोडून भाजपमध्ये गेले. यांचे चुकीचे धोरण व नेतृत्वामुळे त्यांची स्थानिक रायपूर (हिंगणा ) ता. हिंगणा या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाची सत्ता गेली.

पक्षाकडून येणारी निवडणूकीची रसद स्वतःचे घरी वापरल्यामुळे हिंगणा नगरपंचायतीची सत्ता गेली. बहूजन समाज असलेल्या हिंगणा विधानसभेतून पक्षाने एका अल्पसंख्याक व्यक्तीला ३ वेळा आमदार, महामंडळाचे अध्यक्ष, अन्न व नागरी पुरवठा मंत्री इ. पदे दिली असतांना जीवनाच्या ८० व्या वर्षात पक्षाची सेवा बहूजन तरुणाच्या हातात देतांना अजुनही मी म्हणजेच पक्ष या आर्विभावात ते वागत असुन गटा-तटाचे राजकारण ते करीत आहेत. त्यामुळेच हिंगणा विधानसभेत मागील ३ वेळेपासुन पक्षाचा दारुण पराभव झालेला आहे. त्यांनी तरुणांना समोर करून जीवनाचा उर्वरीत काळ चिंतन, मननात घालवावा त्यांनी या वयात वडीलधा-यांची भुमिका घेवून नवीन नेतृत्वाला आर्शीवाद देण्याचे काम करावे. त्यांनी हिंगणा तालूका व जिल्हयाचे स्वपक्षातील लोकांविषयी व्देषाचे राजकारण करु नये. पक्ष सत्तेत असो वा नसो आम्ही जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सतत संघर्ष करीत असुन यापूर्वीसुध्दा पक्षासोबत राहिलो व आजही पक्षातच आहे.

पडतीचे काळात आम्ही पक्षासाठी दिलले योगदान श्री. बंग साहेब यांनी विसरु नये ते स्वतःचा गट-तट निर्माण करण्यासाठी आम्हाला डावलत आहे. ज्याचे पक्षासाठी काहीही योगदान नाही अशा स्वतःचे घरातील नव्यांना पक्षात महत्व दिले जात आहे. आमचा मानसिक छळ करणे व आम्हाला पक्षातून बाहेर पडण्यास प्रवृत्त केले जात आहे. कष्ट आम्ही करायचे आणि फळे यांनी खायची या सवयीमुळे पक्षातील अनेक जुने कार्यकर्ते श्री. बंग साहेब यांचेवर नाराज असुन आमच्या सारख्या बहूजन, वंचित, शोषित पिडीतांचा आवाज श्री. बंग साहेब यांनी बंद करण्याचा प्रयत्न करु नये असा आरोप प्रविण खाडे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषद मध्ये हिंगणा येथे केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles