
प्रेम काय असतं
हृदयाचं हृदयाशी मनोमिलन असतं.
डोळ्यांचं डोळ्यांशी संमेलन असतं.
स्पर्श करता झालेलं उत्तेजन असतं.
प्रेम एक पवित्र रसायन असतं.!1!
भावनेचं भावनेशी गुंफण असतं.
आतल्या आत होणार कंपणं असतं.
हृदय पटल्यावर नावाचं लिंपण असतं.
प्रेम एक निर्मळ शिंपणं असतं.!2!
अंतरंगी गाभाऱ्यात कोणीतरी आपलं असतं.
अंतर्बाह्य त्यानेच तर व्यापलं असतं.
हृदयात त्याला कायम जपलं असतं.
प्रेम दोन जिवांचा शिंपलं असतं.!3!
एकमेकांसाठी फक्त जगणं असतं.
एकमेकांसाठी आता त्यागणं असतं.
एकमेकांसाठी देवाकडे मागणं असतं.
प्रेम ही काळजी अन् जपून वागणं असतं.!4!
प्राजक्ता आर. खांडेकर, नागपूर
======