प्रवास..

प्रवास



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

साहित्य माझे जीवन
मज तयाचा आधार
अनमोल क्षेत्रातून
स्वप्न होतसे साकार||१||

असे सुंदर साहित्य
येतसे माझ्या जीवनी
सदैव राही सोबत
आपल्याच आजीवनी||२||

दोन वर्षांपूर्वी आलो
साहित्यिकांच्या क्षेत्रात
प्रत्येक कवींच्या कविता
अशा भरल्या नेत्रात||३||

वाचूनी निर्माण झाली
कविता करण्याची आवड
दैनंदिन जीवनातून
थोडी काढली सवड||४||

काव्यांजली, अभंग
शिकलो काव्यप्रकार असे
नवनवीन प्रकार शिकण्याची
इच्छा माझ्या मनी वसे||५||

साहित्य क्षेत्राचा प्रवास
साहित्य हे माझे जीवन
परमेश्वरा घालतो साकडे
सोबत राहो आजीवन||६||

विनायक कृष्णराव पाटील
बेळगाव, कर्नाटक
======

Previous article
Next article

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles