प्रवास अंदमान निकोबारचा..

प्रवास अंदमान निकोबारचापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अंदमान निकोबार
सृष्टीसौंदर्याने नटलेले
हिरवाईचा साज लेवून
सदा हे बेट बहरलेले

क्रांतिकारकांच्या बलिदानाने
ही भूमी पावन झालेली
सेल्युलर जेलची महती
साऱ्या विश्वात गाजलेली

कितीतरी यातना सहन करत
देशप्रेमी फासावर गेले
ध्वनीमुद्रित लेझर शो ने
अंगावर रोमांच उभे राहिले

रॉस आयलंडवर आहेत
ऐतिहासिक वास्तूंची निशाणी
पडझड झालेल्या महलांची
ऐकली आम्ही कहाणी

राधानगर नील आयलंड
केशरी रंग सूर्यास्ताचा
ग्लास बोटमधून पाहिला
गालिचा समुद्रतळाचा

साद घातली एकरूप होऊन
त्या फेसाळत्या सागराला
विविध सागरी खेळातून
खेळाचा थरार अनुभवला

प्रांजली अभय जोशी
विरार, जि.पालघर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles